मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळेल 3000 रुपये पेन्शन, वाचा किती द्यावा लागेल प्रीमियम

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळेल 3000 रुपये पेन्शन, वाचा किती द्यावा लागेल प्रीमियम

जर तुम्ही पीएम-शेतकरी सन्मान निधी योजनेचे खातेधारक असाल तर तुमची नोंदणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय पंतप्रधान शेतकरी मानधन या योजनेसाठी होईल.

जर तुम्ही पीएम-शेतकरी सन्मान निधी योजनेचे खातेधारक असाल तर तुमची नोंदणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय पंतप्रधान शेतकरी मानधन या योजनेसाठी होईल.

जर तुम्ही पीएम-शेतकरी सन्मान निधी योजनेचे खातेधारक असाल तर तुमची नोंदणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय पंतप्रधान शेतकरी मानधन या योजनेसाठी होईल.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: जर तुम्ही पीएम-शेतकरी सन्मान निधी योजनेचे खातेधारक असाल तर तुमची नोंदणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय पंतप्रधान शेतकरी मानधन या योजनेसाठी होईल. एवढेच नव्हे तर या पेन्शन योजनेसाठी तुमचे योगदान देखील सन्मान निधी योजनेच्या पैशातून कापले जाईल. तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या तीन हप्त्यांमध्ये मिळणाऱ्या 6000 रुपयांसह वार्षिक 36000 रुपयांच्या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचं नाव पंतप्रधान किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) आहे. या योजनेअंतर्गत देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वृद्धापकाळात योग्य जीवन जगण्यासाठी सरकारकडून पेन्शन दिली जाते. या अंतर्गत देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण होताच त्यांना 3000 रुपये मासिक पेन्शन दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी पीएम शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये आणि वयाच्या साठाव्या वर्षानंतर पीएम किसान मानधन योजनेनुसार दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळतील.

हे वाचा-Rakesh Jhunjhunwala यांच्या पसंतीचा 86 रुपयांचा स्टॉक देईल मोठा रिटर्न,वाचा कारण

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्याकरता प्रत्येक शेतकऱ्याच्या वयानुसार, दर महिन्याचं योगदान कमीत कमी 55 ते जास्तीत जास्त 200 रुपये आहे. अर्थात कमीत कमी 660 रुपये वार्षिक तर जास्तीत जास्त 2400 रुपये वार्षिक भरावे लागतील. पीएम किसान मानधन योजना किसान पेन्शन योजना म्हणूनही ओळखली जाते. या अंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. केंद्र सरकारचे लक्ष्य आहे की 2022 पर्यंत सुमारे 5 कोटी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट केले जावे. ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल. जर लाभार्थी शेतककऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला  1500 रुपये दिले जातील.

हे वाचा-PF च्या पैशांवर मोठ्या संकटाची भीती, EPFO ने सर्व सदस्यांसाठी जारी केला अलर्ट

या स्कीमसाठी लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. ते खाते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. तुमच्या खात्यात पेन्शनचे पैसे डिरेक्ट ट्रान्सफर केले जातीलय.

कशाप्रकारे कराल अर्ज?

किसान मानधन योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या साइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मोबाइल क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. याठिकाणी तुम्हाला नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, कॅप्चा कोड इ. माहिती द्यावी लागेल. यानंतर ओटीपी जनरेट होईल, तो प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर एक अॅप्लिकेशन फॉर्म भरून तो सबमिट करावा लागेल. या फॉर्मची प्रिंट काढून ठेवा जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास तुम्हाला तो वापरता येईल.

First published:

Tags: Money, Pension, Pension funds, PM Kisan