मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PF च्या पैशांवर मोठ्या संकटाची भीती, EPFO ने सर्व सदस्यांसाठी जारी केला अलर्ट

PF च्या पैशांवर मोठ्या संकटाची भीती, EPFO ने सर्व सदस्यांसाठी जारी केला अलर्ट

जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी (Important for PF Account Holders) एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सर्व ग्राहकांना (EPFO Alert) अलर्ट जारी केला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 10 ऑक्टोबर: जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी (Important for PF Account Holders) एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सर्व ग्राहकांना (EPFO Alert) अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, त्याच्या पीएफ निधीची रक्कम सर्वात महत्वाची आहे. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याज देखील उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.

काय आहे EPFO चा अलर्ट?

ईपीएफओने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे, "ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही."

सतर्क राहाणं आवश्यक

ईपीएफओच्या नावाने येणाऱ्या फोन कॉल्सपासून नेहमी सतर्क राहाणं आवश्यक आहे. याशिवाय ईपीएफओची बनावट वेबसाईट वापरूनही ग्राहकांना फसवले जाते, त्याविषयीही जागरुक राहणे आवश्यक आहे. जर तुम्ही ईपीएफओच्या अलर्टकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते.

मोदी सरकार या योजनेअंतर्गत मुलींना देतंय 2000 रुपये? वाचा सविस्तर माहिती

बँक ग्राहकांनीही बाळगा सावधानता

देशभरातील विविध बँकांकडून देखील ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला जातो. काही भामटे बँकां, RBIचे अधिकारी बनून ग्राहकांना फोन करतात आणि त्यांची फसवणूक करतात. यामुळे ग्राहकांचा निधी धोक्यात येऊ शकतो. बँका त्यांच्या वेबसाइट्सवरुन किंवा सोशल मीडिया हँडल्सवरून याबाबत अलर्ट जारी करत

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news