• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Rakesh Jhunjhunwala यांच्या पसंतीचा 86 रुपयांचा स्टॉक देईल मोठा रिटर्न, वाचा काय आहे कारण?

Rakesh Jhunjhunwala यांच्या पसंतीचा 86 रुपयांचा स्टॉक देईल मोठा रिटर्न, वाचा काय आहे कारण?

बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock) यांनी एप्रिल ते जून या महिन्याच्या तिमाहीत फेडरल बँकेत (Federal Bank Share Price) त्यांची भागीदारी 0.40 टक्क्यांनी वाढवली आहे.

 • Share this:
  मुंबई, 10 ऑक्टोबर: बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock) यांनी एप्रिल ते जून या महिन्याच्या तिमाहीत फेडरल बँकेत (Federal Bank Share Price) त्यांची भागीदारी 0.40 टक्क्यांनी वाढवली आहे. ज्यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फेडरल बँकेत 75 लाखापेक्षा  अधिक शेअर्स जोडले गेले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हा बँकिंग स्टॉक 70 ते 90 रुपयांच्या रेंजमध्ये राहिला आहे आणि त्याने आपल्या भागधारकांना जास्त परतावा दिला नाही. असे असूनही, फेडरल बँकेच्या जुलै 2021 च्या शेअरहोल्डिंगनुसार, राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकवरील आपला विश्वास कायम ठेवून फेडरल बँकेत आपला हिस्सा कायम ठेवला आहे. त्याच वेळी, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे असलेला हा स्टॉक Q2FY22 च्या मजबूत नंबर्सनंतर वरच्या दिशेने जाण्याची चिन्हे दर्शवित आहे. मोठ्या उसळीची शक्यता शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार, फेडरल बँकेने मजबूत व्यवसायिक गती दर्शवली आहे आणि त्यांचे शेअर्स आगामी ट्रेडिंग सत्रांमध्ये मोठी उसळी घेऊ शकतात. या स्टॉकबाबत बोलताना, एंजल वनच्या ज्योती रॉय यांनी सांगितले की फेडरल बँकेने  Q2FY22 साठी मजबूत व्यवसाय गती दर्शविली आहे कारण तिमाहीच्या आधारावर याचे अॅडव्हान्सेस 3.4 टक्क्यांनी वाढून 1,37,3091 कोटी रुपये झाले आहेत. हे वाचा-Petrol-Diesel price Today: आज पुन्हा इंधन दरात वाढ; मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर काय आहे रिपोर्ट? तिमाही आधारावर डिपॉझिट 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 1,68,743 कोटी रुपये झाले आहे. तर तिमाही आधारावर  CASA रेश्यो 135 बीपीएसने वाढून 36.16 टक्के झाला आहे. याशिवाय व्यावसायिक गतीमध्ये झालेल्या सुधारणेसह फेडरल बँकेसाठी मालमत्ता गुणवत्ता आणि क्रेडिट खर्चात घट होण्याची अपेक्षा आहे. (डिस्क्लेमर: बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कुणालाही https://lokmat.news18.com/ वरून पैसे गुंतवण करण्याचा सल्ला दिला जात नाही.)
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: