मराठी बातम्या /बातम्या /मनी /PM KISAN मध्येही होतोय घोटाळा! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार पैसे

PM KISAN मध्येही होतोय घोटाळा! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार पैसे

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) फसवणूकीची प्रकरणं समोर आल्यानंतर आता सरकार अपात्र शेतकऱ्यांकडून वसूली करत आहे. सरकारने अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी (PM Kisan Ineligible farmers List) जाहीर केली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) फसवणूकीची प्रकरणं समोर आल्यानंतर आता सरकार अपात्र शेतकऱ्यांकडून वसूली करत आहे. सरकारने अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी (PM Kisan Ineligible farmers List) जाहीर केली आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांना त्यांना मिळालेले पैसे केंद्राला परत करावे लागणार आहेत. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत फ्रॉडच्या (Fraud in PM KISAN) तक्रारींबाबत चौकशीदरम्यान उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये  55,243 अपात्र शेतकऱ्यांचा शोध लागला होता.

दरम्यान अपात्र शेतकऱ्यांमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर काही श्रेणीतील शेतकऱ्यांचा समावेश होतो. शिवाय असे देखील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत जे सरकारी नोकरीत आहेत किंवा एखादा स्वत:चा व्यवसाय करत आहेत. असे असूनही पीएम किसान योजनेंतर्गत त्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जात होते. सप्टेंबर 2021 मध्ये जिल्हा स्तरावर तपास करण्यात आला, ज्यामध्ये ही फसवणूक उघडकीस आली. असे असताना जिल्हा कृषी विभागाकडून अपात्र शेतकऱ्यांना वसूलीची नोटीस बजावण्यात येत आहे.

हे वाचा-इंधनाचे लेटेस्ट दर जारी, आज 1 लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?

पती-पत्नी दोघांच्या नावे फायदा घेणेही चुकीचे

या योजनेबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून फसवणुकीच्या तक्रारी केंद्र सरकारपर्यंत पोहोचल्या होत्या. या मोठ्या संख्येने असे शेतकरी आहेत जे सरकारी नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत. शिवाय फसवणुकीच्या काही घटनांमध्ये या योजनेची रक्कम पत्नी आणि पत्नी दोघांच्याही बँक खात्यात पोहोचत होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी लाभार्थी शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही लाभ घेतला जात होता. याशिवाय काही प्रकरणांमध्ये चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जात होते.

हे वाचा-अबब! कृषी मेळाव्यात तब्बल 1 कोटींचा बैल, एवढ्या किंमतीमागे आहे मोठं कारण

कर भरणारे किंवा पेन्शन घेणारे शेतकरीही अपात्र

काही शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. करदाते किंवा पेन्शनधारक शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ दिला जात नाही. तसंच जर तुमच्या घरातील एकाच जमिनीवर एकापेक्षा जास्त सदस्यांच्या खात्यात योजनेचा हप्ता येत असेल, तर तुम्हाला पैसे परत करावे लागतील. आता अपात्र शेतकर्‍यांच्या यादीत तुमचाही समावेश आहे की नाही हे तुम्ही यादीत तुमचे नाव देखील तपासू शकता. एवढेच नाही तर काही अपात्र शेतकऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल होऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: Financial fraud, PM Kisan, PM narendra modi