मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel Price Today: इंधनाचे लेटेस्ट दर जारी, आज 1 लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Petrol Diesel Price Today: इंधनाचे लेटेस्ट दर जारी, आज 1 लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर (Petrol-Diesel Price on 16th November 2021) जारी केले आहेत. आजही इंधनाच्या दरात (Fuel rate today) कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर (Petrol-Diesel Price on 16th November 2021) जारी केले आहेत. आजही इंधनाच्या दरात (Fuel rate today) कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर (Petrol-Diesel Price on 16th November 2021) जारी केले आहेत. आजही इंधनाच्या दरात (Fuel rate today) कोणताही बदल झालेला नाही.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर (Petrol-Diesel Price on 16th November 2021) जारी केले आहेत. आजही इंधनाच्या दरात (Fuel rate today) कोणताही बदल झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली होती. त्यानंतर गेल्या बऱ्याच कालावधीपासून दरांमध्ये वाढ झालेली नाही. यूपीमधील अनेक शहरांसह काही ठिकाणी पेट्रोल 100 रुपये प्रति लीटरपेक्षा कमी दराने मिळते आहे.

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे.

हे वाचा-Car Offers : कार-बाईक खरेदीवर YONO SBI कडून खास ऑफर्स, वाचा सविस्तर

आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे.

काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?

>> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर

या शहरांत 100 रुपयांपेक्षाही कमी आहेत पेट्रोलचे दर

>> पोर्ट ब्लेयर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर

>> नोएडा पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 87.01 रुपये प्रति लीटर

>> ईटानगर पेट्रोल 92.02 रुपये आणि डिझेल 79.63 रुपये प्रति लीटर

>> चंदीगड पेट्रोल 94.23 रुपये आणि डिझेल 80.9 रुपये प्रति लीटर

>> आयजोल पेट्रोल 94.26 रुपये आणि डिझेल 79.73रुपये प्रति लीटर

>> लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.8 रुपये प्रति लीटर

हे वाचा-सिनेमाच्या तिकीटावर मिळवा 50 टक्के डिस्काउंट; 'या' बँकेच्या क्रेडिट कार्डवर ऑफर

>> शिमला पेट्रोल 95.78 रुपये आणि डिझेल 80.35 रुपये प्रति लीटर

>> पणजी पेट्रोल 96.38 रुपये आणि डिझेल 87.27 रुपये प्रति लीटर

>> गंगटोक पेट्रोल 97.7 रुपये आणि डिझेल 82.25 रुपये प्रति लीटर

>> रांची पेट्रोल 98.52 आणि डिझेल 91.56 रुपये प्रति लीटर

>> शिलाँग पेट्रोल 99.28 आणि डिझेल 88.75 रुपये प्रति लीटर

>> देहरादून पेट्रोल 99.41 आणि डिझेल 87.56 रुपये प्रति लीटर

>> दमण पेट्रोल 93.02 आणि डिझेल 86.9 रुपये प्रति लीटर

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise