मराठी बातम्या /बातम्या /देश /अबब! कृषी मेळाव्यात तब्बल 1 कोटींचा बैल, एवढ्या किंमतीमागे आहे मोठं कारण

अबब! कृषी मेळाव्यात तब्बल 1 कोटींचा बैल, एवढ्या किंमतीमागे आहे मोठं कारण

कृषी मेळाव्यात एक बैल (Bull of worth Rs 1 crore attracting attention of farmers) शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून त्याची किंमत तब्बल 1 कोटी रुपये आहे

कृषी मेळाव्यात एक बैल (Bull of worth Rs 1 crore attracting attention of farmers) शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून त्याची किंमत तब्बल 1 कोटी रुपये आहे

कृषी मेळाव्यात एक बैल (Bull of worth Rs 1 crore attracting attention of farmers) शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून त्याची किंमत तब्बल 1 कोटी रुपये आहे

बंगळुरू, 15 नोव्हेंबर: कृषी मेळाव्यात एक बैल (Bull of worth Rs 1 crore attracting attention of farmers) शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून त्याची किंमत तब्बल 1 कोटी रुपये आहे. बंगळुरूच्या कृषी प्रदर्शनात हा बैल आणण्यात आला (Bengalore agriculture fair) असून अनेकजण त्या बैलासोबस सेल्फी काढून घेत आहेत. प्राण्यांच्या किंमती गेल्या काही महिन्यांपासून वाढल्या आहेत. मात्र या बैलाची किंमत ऐकल्यावर प्रत्येकालाच आश्चर्य वाटत आहे.

1 कोटींचा बैल

या बैलाची किंमत आहे 1 कोटी रुपये. हल्लीकर जातीचा हा बैल असल्यामुळे त्याची किंमत तेवढी असल्याचं सांगण्यात येतं. हल्लीकर जातीच्या बैलाला बाजारात प्रचंड मागणी असून हे प्राणी सहसा मिळत नाहीत. त्यामुळे त्यासाठी लोक वाटेल ती किंमत मोजायला तयार होतात. साडेतीन वर्षांचा हा बैल उमदा असून त्याच्या सीमेनला प्रचंड मागणी असल्याचं बैलाचे मालक सांगतात.

बैल नव्हे सोन्याची खाण

या बैलाचे मालक बैलामुळे श्रीमंत झाले आहेत. या बैलाच्या सीमेनचा एक डोस ते 1 हजार रुपयांना विकतात. या सीमेनला बाजारात सर्वाधिक मागणी असते. त्यामुळेच या बैलाची किंमत प्रचंड वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या बैलाला पाहण्यासाठी दूरदूरच्या गावातून लोक गर्दी करत असून त्याची किंमत ऐकून आश्चर्यचकित होत आहेत.

हे वाचा- श्रेया बुगडेनं दिलेल्या गिफ्टमुळं कुशल बद्रिके आयुष्य पलटलं; असा आहे किस्सा

सर्वात उमदी जात

बंगळुरूच्या या प्रदर्शनात 1 कोटी रुपयांच्या बैलाचे मालक असणाऱ्या बौरेगोडा यांनी बैलाला प्रचंड मागणी असल्याचं म्हटलं आहे. या बैलासोबत सेल्फी काढणं हेदेखील प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात असून त्यासाठी लोक गर्दी करत आहेत. कृषी क्षेत्रात अधिकाधिक चांगल्या जातीचे बैल आणि गायी जन्माला येण्यासाठी हल्लीकर जातीच्या बैलांची संख्या वाढणं गरजेचं असल्याचं ते सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार असून दुग्धोत्पादनात देखील वाढ होणार आहे.

First published:

Tags: Agriculture, Bengaluru