Home /News /money /

PM Kisan: तुमच्या खात्यात नाही आलेत दहाव्या हप्त्याचे 2000 रुपये, त्वरित करा हे काम

PM Kisan: तुमच्या खात्यात नाही आलेत दहाव्या हप्त्याचे 2000 रुपये, त्वरित करा हे काम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi PM Kisan Yojana) यांनी शेतकऱ्यांना नवीन वर्षाची (New Year 2022) भेट देत PM शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Scheme Samman Nidhi 10th installment) योजनेचा 10 वा हप्ता शनिवारी जारी केला आहे.

    मुंबई, 02 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi PM Kisan Yojana) यांनी शेतकऱ्यांना नवीन वर्षाची (New Year 2022) भेट देत PM शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Scheme Samman Nidhi 10th installment) योजनेचा 10 वा हप्ता शनिवारी जारी केला आहे. तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे मिळाले की नाही हे तपासा. दरम्यान असेही काही शेतकरी आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांपैकी तुम्ही असाल तर सर्वात आधी सरकार द्वारे जारी करण्यात आलेल्या हेल्पलाइनशी संपर्क साधा आणि तुमची तक्रार नोंदवा. तुम्ही सोमवार ते शुक्रवार या दरम्यान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) च्या ई-मेल (Email) वर देखील pmkisan-ict@gov.in संपर्क करू शकता. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करून देखील तक्रार करू शकता. पैसे न मिळाल्यास या क्रमांकावर करा तक्रार पीएम किसानची नवी हेल्पलाइन: 011-24300606 पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266 पीएम किसान हेल्पलाइन नंबर:155261 हे वाचा-Petrol Price Today: आज काय आहे इंधनाचा भाव? पुणे-मुंबईत पेट्रोल 109 रुपयांपार पीएम किसान लँडलाइन नंबर्स: 011—23381092, 23382401 पीएम किसान आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109 ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in या कारणामुळे अडकतील पीएम किसानचे पैसे अनेकदा सरकारकडून पैसे पाठवले जातात मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचत नाहीत. यामध्ये काही तांत्रिक कारणं देखील असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांनी प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आणि खाते क्रमांक यामध्ये गोंधळ असल्यास ते पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. दरवर्षी मिळतो 6000 रुपयांचा फायदा केंद्र सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवते. आतापर्यंत या योजनेचे दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट्य आहे. ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारने सुरू केली होती. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. हे वाचा-5.25 रुपयांच्या बँकिंग शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती! तुमच्याकडे आहे का हा शेअर? या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो. छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: New year, PM Kisan, PM narendra modi

    पुढील बातम्या