Home /News /money /

Petrol Price Today: आज काय आहे इंधनाचा भाव? पुणे-मुंबईत पेट्रोल 109 रुपयांपार

Petrol Price Today: आज काय आहे इंधनाचा भाव? पुणे-मुंबईत पेट्रोल 109 रुपयांपार

पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price on 02nd January 2022) जारी करण्यात आले आहेत पण आजही त्यात कोणताही बदल झालेला नाही. आजही इंधनासाठी (Latest Fuel Rates) सामान्यांना तेवढीच किंमत मोजावी लागणार आहे.

    मुंबई, 02 जानेवारी: पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price on 02nd January 2022) जारी करण्यात आले आहेत पण आजही त्यात कोणताही बदल झालेला नाही. आजही इंधनासाठी (Latest Fuel Rates) सामान्यांना तेवढीच किंमत मोजावी लागणार आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरात काही पैशांनी इंधनाचे दर बदलले आहेत, अर्थात त्यात फार मोठा बदल झालेला नाही. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 0.08 पैशांनी कमी होऊन आज दर 109.75 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 0.08 पैशांनी कमी होऊन 92.53 रुपये प्रति लीटरवर आहे. लवकर स्वस्त होणार इंधन पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन प्लॅन तयार करत आहे. भारत कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांसह समन्वयाने भारत धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे. हे वाचा-कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्ज कोण फेडणार? कर्जानुसार काय आहेत नियम? दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. महाराष्ट्रातील इंधनाचे दर
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.75 रुपये92.53 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक110.28 रुपये93.04 रुपये
    नागपूर109.75 रुपये92.56 रुपये
    अहमदनगर110.60 रुपये93.36 रुपये
    औरंगाबाद111.05 रुपये93.79 रुपये
    रत्नागिरी111.68 रुपये94.42 रुपये
    रायगड110.15 रुपये92.89 रुपये
    परभणी112.88 रुपये95.55 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली109.65 रुपये92.47 रुपये
    कोल्हापूर109.66 रुपये92.48 रुपये
    अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. हे वाचा-आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर 31 डिसेंबरपर्यंत 5.89 कोटी विवरणपत्रे दाखल इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Petrol price

    पुढील बातम्या