Home /News /money /

5.25 रुपयांच्या बँकिंग शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती! तुमच्याकडे आहे का हा शेअर?

5.25 रुपयांच्या बँकिंग शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती! तुमच्याकडे आहे का हा शेअर?

HDFC Bank च्या शेअरची प्राईज हिस्ट्री पाहता या बँकिंग शेअरवर गेल्या 6 महिन्यांपासून विक्रीचा दबाव आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये 1.50 टक्क्यांची घसरण झाली आहे.

    मुंबई 1 जानेवारी : चांगला शेअर निवडणे आणि त्यावर दीर्घकाळ टिकून राहणे हीच शेअर बाजारात (share market investment)  पैसे कमवण्याची गुरुकिल्ली आहे, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. या धोरणावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, HDFC बँक स्टॉक हे एक उत्तम उदाहरण आहे. हा बॅकिंग स्टॉक 1 जानेवारी 1999 रोजी NSE वर 5.52 रुपयांवर बंद झाला होता. तर 31 डिसेंबर 2021 रोजी हा शेअर 1481 रुपयांवर बंद झाला. या 23 वर्षांच्या कालावधीत या स्टॉकमध्ये 268 पट वाढ झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअरची (HDFC Bank share price) प्राईज हिस्ट्री पाहता या बँकिंग शेअरवर (Banking Shares) गेल्या 6 महिन्यांपासून विक्रीचा दबाव आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये 1.50 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या 1 वर्षात केवळ 4 टक्के वाढला आहे. त्यामुळे याचा अर्थ असा नाही की एचडीएफसी बँक हा खराब स्टॉक आहे आणि एखाद्याने या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरले पाहिजे. इतर बँकिंग शेअरप्रमाणेच, एचडीएफसी बँकेवरही गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीचा दबाव आहे. कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्ज कोण फेडणार? कर्जानुसार काय आहेत नियम? चेक करा याआधी जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिली, तर हा शेअर गेल्या 5 वर्षांतील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. गेल्या 5 वर्षात हा स्टॉक 596 रुपयांवरून 1481 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरमध्ये सुमारे 150 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 10 वर्षात एचडीएफसी बँकेचा स्टॉक सुमारे 215 रुपयांवरून 1481 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत स्टॉक 7 पट वाढला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 20 वर्षात हा शेअर 22 रुपयांवरून 1481 रुपयांपर्यंत 67 पटीने वाढला आहे. तर गेल्या 23 वर्षांत हा स्टॉक 5.52 रुपयांवरून 1481 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्याने आपल्या भागधारकांना 26,725 टक्के परतावा दिला आहे. PPF ते सुकन्या समृद्धी योजनेसह छोट्या बचत योजनांचे व्याजदर जैसे थे; काय आहेत सध्याचे व्याजदर? जर तुम्ही या शेअरची हालचाल पाहिली तर जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी HDFC बँकेत 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 2.5 लाख रुपये मिळाले असतील. दुसरीकडे, 10 वर्षांपूर्वी एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 7 लाख रुपये मिळाले असते. तसेच 20 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये जर कुणी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 67 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, जर एखाद्याने 23 वर्षांपूर्वी 5.52 रुपये प्रति शेअर या दराने एचडीएफसी बँकेत 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि तो आतापर्यंत या स्टॉकमध्ये राहिला असता, तर त्याला आज 2.68 कोटी रुपये मिळाले असते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Hdfc bank, Share market

    पुढील बातम्या