Home /News /money /

SBI खातं ब्लॉक झाल्याचा मेसेज आला असेल तर सावधान! अकाउंट रिकामं होण्याची भीती

SBI खातं ब्लॉक झाल्याचा मेसेज आला असेल तर सावधान! अकाउंट रिकामं होण्याची भीती

PIB Fact Check: ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी आजकाल वेगवेगळे पर्याय निवडले जात आहेत. ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून त्यांना चुकीच्या लिंकवर भाग पाडले जाते.

    मुंबई, 01 सप्टेंबर: ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी आजकाल वेगवेगळे पर्याय निवडले जात आहेत. ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून त्यांना चुकीच्या लिंकवर भाग पाडले जाते. याद्वारे त्यांची वैयक्तिक माहिती हॅक करून लाखोंचा गंडा घालण्याचे व्यवहार सुरू आहेत. दरम्यान एसबीआयच्या नावाचा वापर करून ग्राहकांना असेच फसवणूक करणारे मेसेज पाठवले जात आहेत. तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा. कारण चुकीच्या किंवा ज्याचा सोअर्स माहित नाही आहे अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकते. ऑनलाइन माध्यमातून (Online Fraud) फसवणूक करणाऱ्या व्यक्ती सातत्याने याच विचारात असतात, की स्मार्टफोन युजर्सना आपल्या जाळ्यात कसं ओढायचं. त्यासाठी ते दररोज नवनव्या पद्धती शोधून काढत असतात. सध्या ग्राहकांना पाठवण्यात येणारा मेसेजदेखील अशाच प्रकारे फसवणुकीचा असून, प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो अर्थात 'पीआयबी'ने फॅक्ट चेकद्वारे याबद्दलचा इशारा दिला आहे. हे वाचा-Jan Dhan खातेधारकांसाठी खूशखबर! मोदी सरकार लवकरच मोठी घोषणा करण्याच्या विचारात काय आहे मेसेज? ग्राहकांना असा मेसेज केला जात आहे की, 'प्रिय ग्राहक, तुमचे एसबीआय खाते ब्लॉक करण्यात आले असून तुमची कागदपत्र अपडेट करा. बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. नेट बँकिंगच्या माध्यमातून अपडेट करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.' या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे. हे वाचा-Sovereign Gold मध्ये स्वस्त सोन्यासह मिळतील हे 6 फायदे, आहे 2 दिवसांची संधी पीआयबी फॅक्ट चेकने काय म्हटले? केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (Press Information Bureau) जेव्हा या मेसेजची सत्यता पडताळून पाहिली, तेव्हा असं लक्षात आलं, की हा मेसेज खोटा आहे. असा कोणताही मेसेज बँकेकडून पाठवण्यात आला नाही आहे. हा मेसेज फेक असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने असे आवाहन देखील केले आहे की, तुमची वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या मेल्स आणि एसएमएसना रिप्लाय देऊ नका. तुम्हाला देखील असा मेसेज आला असल्यास report.phishing@sbi.co.in वर तक्रार दाखल करा. तुम्हालाही असा कोणताही संशयास्पद मेसेज आला असेल, तर त्याची सत्यता पडताळण्यासाठी तो पीआयबीकडे पाठवता येईल. https://factcheck.pib.gov.in या वेबसाइटवर तुम्ही याबाबत अधिक माहिती मिळवू शकता. 918799711259 या व्हॉट्सअॅप नंबरला किंवा pibfactcheck@gmail.com या ई-मेल आयडीवरही अशा मेसेजबद्दलची माहिती पाठवू शकता. तिथून तुम्हाला तो मेसेज खरा आहे की खोटा, हे कळवलं जाईल. पीआयबीकडे आलेल्या अशा सर्व संशयास्पद मेसेजेसची माहिती https://pib.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते. त्या माहितीचा उपयोग सर्वांना होऊ शकतो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: SBI, SBI bank, SBI Bank News

    पुढील बातम्या