नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: जनधन खातेधारकांना (
PM Jan Dhan) सरकारकडून मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार जनधन खातेधारकांसाठी नवीन सुविधा सुरू करणार आहे. पंतप्रधान जनधन योजनेच्या (
PMJDY) सर्व खातेधारकांना जीवन वीमा आणि अपघात कव्हर मिळू शकतो. सरकार पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजना (
PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा वीमा (
PMSBY)या योजनेच्या माध्यमातून वीमा कव्हर देण्याचा विचार करत आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
मंत्रालयाने काय दिली माहिती?
पंतप्रधान जनधन योजना या वित्तिय सर्वसमावेशक योजनेच्या सात वर्षांच्या यशानंतर सरकार 430 मिलियनहून अधिक खातेधारकांना जीवन आणि अपघात वीमा प्रदान करण्याच विचार करत आहे. यासंबंधात बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 2014 साली पंतप्रधान जनधन योजनेची घोषणा करण्यात आली होती. वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, PMJJBY प्रति दिन केवळ 1 रुपयांच्या प्रीमियमसाठी 2 लाखांचा वीमा देते. या योजनेसाठी एकूण 330 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागतो.
हे वाचा-Sovereign Gold मध्ये स्वस्त सोन्यासह मिळतील हे 6 फायदे, आहे 2 दिवसांची संधी
काय आहे ही योजना?
केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा अभियानाअंतर्गत दोन स्कीम लाँच करण्यात आल्या होत्या. एक पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजना (PMJJBY) आणि दुसरी पंतप्रधान सुरक्षा वीमा (PMSBY). पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा जीवन वीमा दिला जातो. याकरता वार्षिक प्रीमियम 330 रुपयांचा आहे. पंतप्रधान सुरक्षा वीमा योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू आणि पूर्ण अंपगत्त्व अशा स्थितीमध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कव्हर दिला जातो.
हे वाचा-लक्षात ठेवा 30 सप्टेंबर ही तारीख, महत्त्वाची कामं पूर्ण करण्याची आहे डेडलाइन
तुम्ही देखील उघडू शकता जनधन खातं
तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत भेट द्या. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल. तसेच PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट उघडू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचं वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे ते जन धन खातं उघडू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.