Home /News /money /

Sovereign Gold Bond मध्ये स्वस्त सोन्यासह मिळतील हे 6 फायदे, तुमच्याकडे आहे 2 दिवसांची संधी

Sovereign Gold Bond मध्ये स्वस्त सोन्यासह मिळतील हे 6 फायदे, तुमच्याकडे आहे 2 दिवसांची संधी

तुम्हाला देखील स्वस्त सोनं (Cheap Gold) खरेदी करायचे असेल तर तुमच्याकडे ही संधी आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडची (Sovereign Gold Bond scheme) सहावी सीरिज इश्यू करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: तुम्हाला देखील स्वस्त सोनं (Cheap Gold) खरेदी करायचे असेल तर तुमच्याकडे ही संधी आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडची (Sovereign Gold Bond scheme) सहावी सीरिज इश्यू करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील (State Bank of India) याबाबत ट्वीट केले आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड केवळ स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी नसून यासह तुम्हाला आणखीही काही फायदे मिळतात. SBI च्या माहितीनुसार तुम्हाला 3 सप्टेंबरपर्यंत ही संधी आहे, अर्थात आणखी केवळ दोन दिवस तुम्हाला स्वस्तात सोनंखरेदी करता येणार आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या (Sovereign Gold Bond scheme) सहाव्या सीरिजसाठी इश्यू प्राइस 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्हाला प्रति तोळा सोन्यासाठी 47,320 रुपये खर्च करावे लागतील. हे वाचा-Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, सामान्यांना मोठा दिलासा एसबीआयने काय केलं आहे ट्वीट? SBI ने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याची योजना आहे का? सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची सहा गोल्डन कारणं इथे देण्यात आली आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही http://onlinesbi.com ला भेट देऊ शकता. काय आहेत SGB चे सहा महत्त्वाचे फायदे? >> सॉव्हरेन गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 2.5 टक्के दराने व्याजाचे फायदा मिळेल मिळेल >> कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट मिळेल >> सॉव्हरेन गोल्ड बाँड्स कॉलॅटरेल स्वरुपात वापरता येईल >> याशिवाय तुम्हाला सुरक्षेचे टेन्शन राहणार नाही. >> सॉव्हरेन गोल्ड बाँड तुम्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये सहजगत्या ट्रेड करू शकता >> हे सोनं खरेदी करताना कोणताही जीएसटी किंवा मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही. कुठे खरेदी करता येतील सॉव्हरेन गोल्ड बाँड? कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभाजित परिवार (HUF), ट्रस्ट, विद्यापीठ आणि धर्मसंस्था बाँडच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तुम्ही सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून याची खरेदी करू शकता हे वाचा-Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण, पाहा आजचा गोल्ड रेट किती करता येईल गुंतवणूक? सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज 1 ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या