नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: तुम्हाला देखील असा मेसेज आला आहे का ज्यामध्ये असं लिहिण्यात आलं आहे की तुम्हाला 12,500 रुपये द्यायचे आहेत आणि त्या बदल्यात 4 कोटी रुपये मिळतील? तर कृपया या मेसेजकडे दूर्लक्ष करा. आरबीआयच्या नावे जरी हा मेसेज पाठवण्यात आला असला तरी हा मेसेज फ्रॉड आहे. फसवणूक करणाऱ्यांचे हे एक जाळे आहे ज्याअंतर्गत तुम्हाला लुबाडण्याचा प्लॅन आहे. ऑनलाइन माध्यमातून (Online Fraud) फसवणूक करणाऱ्या व्यक्ती सातत्याने याच विचारात असतात, की सामान्यांना आपल्या जाळ्यात कसं ओढायचं. त्यासाठी ते दररोज नवनव्या पद्धती शोधून काढत असतात.
सध्या विविध ग्राहकांना पाठवण्यात आलेला मेसेज अशाच प्रकारचा फसवणुकीचा मेसेज असून, प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो अर्थात 'पीआयबी'ने फॅक्ट (Press Information Bureau or PIB) चेकद्वारे याबद्दलचा इशारा दिला आहे. PIB फॅक्ट चेकने याबाबत ग्राहकांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. हा मेसेज आरबीआयकडून आलेला नसून ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी फसवणुक करणाऱ्यांनी पाटवलेला आहे. विविध बँकांचे अधिकारी बनून हे भामटे ग्राहकांना फोन करतात किंवा मेसेज पाठवतात. आता तर थेट आरबीआयच्या नावे फसवणूक केली जात आहे.
हे वाचा-दरमहा 500 रुपये गुंतवून व्हा मालामाल, उद्या लाँच होतेय ही जबरदस्त योजना
सरकारी संस्थांसारख्याच बनावट पत्राद्वारे आणि बनावट योजनांद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. यामध्ये ग्राहकांना 12500 रुपये भरण्यास सांगून त्या बदल्यात 4 कोटी 62 लाख देण्याचे आश्वासन दिले जात आहे. सरकार द्वारे ही योजना चालवली जात असल्याचेही या भामट्यांकडून सांगितले जात आहे. पीआयबी फॅक्ट चेकने अक्षय कुमारच्या '25 दिन मैं पैसा डबल...' या डायलॉगचा वापर करत फसवणुकीबाबत सावध केले आहे.
Pay Rs 12,500 and get Rs 4 crores 62 lakhs in return‼️
Well, some things are just too good to be true. Fraudsters impersonate Government organisations to dupe people of money. Do not fall for such #FAKE approval letters or schemes in the name of @RBI #PIBFactCheck pic.twitter.com/0K5VJQISPK — PIB Fact Check (@PIBFactCheck) September 6, 2021
हे वाचा-आता इंटरनेट नसतानाही करता येणार UPI पेमेंट, वापरा ही सोपी पद्धत!
एवढंच नव्हे तर या फसवणूक करणाऱ्यांनी आरबीआयची एक बनावट वेबसाइट देखील बनवली आहे. ज्यावर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा फोटो देखील वापरण्यात आला आहे. या वेबसाइटचा हवाला देऊन तुम्हाला फसवण्यात येऊ शकतं, त्यामुळे सावधान राहूनच समोरच्या व्यक्तीला उत्तर द्या.
केंद्र सरकारकडून सुरू केल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेही माहिती सुरुवातीला संबंधित मंत्रालयाकडूनच प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे संबंधित मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट तपासून पाहावी. तसंच, पीआयबी किंवा अन्य विश्वासार्ह माध्यमांमध्ये पडताळणी करावी आणि खात्री पटली, तरच अशा योजनांसाठी अर्ज करावा. अन्यथा अशा खोट्या मेसेजमुळे मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे वाचा-मुंबईतील आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई, भरावा लागणार 2 लाखांचा दंड
तुम्हालाही असा कोणताही संशयास्पद मेसेज आला असेल, तर त्याची सत्यता पडताळण्यासाठी तो पीआयबीकडे पाठवता येतो. https://factcheck.pib.gov.in या वेबसाइटवर जाऊन तो मेसेज अपलोड करावा. 918799711259 या व्हॉट्सअॅप नंबरला किंवा pibfactcheck@gmail.com या ई-मेल आयडीवरही अशा मेसेजबद्दलची माहिती पाठवू शकता. तिथून तुम्हाला तो मेसेज खरा आहे की खोटा, हे कळवलं जाईल. पीआयबीकडे आलेल्या अशा सर्व संशयास्पद मेसेजेसची माहिती https://pib.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते. त्या माहितीचा उपयोग सर्वांना होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.