मराठी बातम्या /बातम्या /मनी /मुंबईतील आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई, भरावा लागणार 2 लाखांचा दंड

मुंबईतील आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई, भरावा लागणार 2 लाखांचा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) केवायसी नियमांचे (KYC know your customer) उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईस्थित  सर्वोदय सहकारी बँकेवर (Sarvodaya Co-operative Bank) दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) केवायसी नियमांचे (KYC know your customer) उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईस्थित सर्वोदय सहकारी बँकेवर (Sarvodaya Co-operative Bank) दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) केवायसी नियमांचे (KYC know your customer) उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईस्थित सर्वोदय सहकारी बँकेवर (Sarvodaya Co-operative Bank) दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

मुंबई, 07 सप्टेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) केवायसी नियमांचे (KYC know your customer) उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईस्थित  सर्वोदय सहकारी बँकेवर (Sarvodaya Co-operative Bank) दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. केवायसी नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने हा दंड बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 च्या सेक्शन  47 A (1) (c) अंतर्गत ठोठावला आहे.

आरबीआयने जारी केलेल्या वक्तव्यात असे नमुद करण्यात आले आहे की, आरबीआयने 06 सप्टेंबर 2021 च्या एका आदेशाद्वारे सर्वोदय सहकारी बँक लिमिटेड, भांडूप (W), मुंबई  या बँकेवर जारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि अनुपालन न केल्याने 2 लाखांचा मॉनेटरी दंड ठोठावला आहे.

RBI ने याआधी या बँकेवर केली आहे कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 03 सप्टेंबर रोजी मुंबईतील बाँबे मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Bombay Mercantile Co-operative Bank) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 लाखांचा दंड ठोठावला होता. RBI ने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, बाँबे मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचा (सहकारी बँकेतील ठेवींवरील व्याजदर) निर्देश, 2016 अंतर्गत येणारे निर्देश आणि सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत दिशानिर्देशांचे पालन न केल्याबद्दल बँकेवर दंड आकारण्यात आला आहे.

हे वाचा-9783 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, आहे गुंतवणुकीची संधी; काय आहे प्रति तोळाचा भाव

ग्राहकांवर काय होणार परिणाम?

आरबीआयने हे स्पष्ट केले आहे की, बँकावर ही कारवाई Regulatory compliance मध्ये कमतरता असल्यामुळे करण्यात आली आहे. ग्राहकांच्या कोणत्याही व्यवहारावर याचा परिणाम होणार नाही. RBI ने काही नियम किंवा तरतुदींचे पालन न केल्याने किंवा नियमांचे उल्लंघन केल्याने हा दंड ठोठावला आला आहे. त्यामुळे याचा ग्राहकांवर काही परिणाम होणार नाही.

हे वाचा-दरमहा 500 रुपये गुंतवून व्हा मालामाल, उद्या लाँच होतेय ही जबरदस्त योजना

Axis बँकेवरही ठोठावला होता दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी अॅक्सिस बँक लिमिटेडवर देखील केवायसी संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याप्रकरणी दंड ठोठावला होता. या महत्त्वाच्या खासगी बँकेवर केंद्रीय बँकेने 25 लाखांचा दंड आकारला होता. केंद्रीय बँकेने अशी माहिती दिली आहे की, फेब्रुवारी आणि मार्च 2020 दरम्यान बँकेच्या एका ग्राहकाच्या खात्याची तपासणी केली गेली. त्यात असे आढळून आले होते की, बँक आरबीआयच्या (RBI) केवायसी संदर्भातील निर्देश, 2016 चे पालन करण्यात अपयशी ठरली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हा दंड रेग्युलेटरचे नियम न पाळल्यामुळे ठोठावण्यात आला होता.

First published:

Tags: Rbi, Rbi latest news