Home /News /money /

आता इंटरनेट नसतानाही करता येणार UPI पेमेंट, वापरा ही सोपी पद्धत!

आता इंटरनेट नसतानाही करता येणार UPI पेमेंट, वापरा ही सोपी पद्धत!

सध्याच्या काळात ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करण्याकडे कल वाढला आहे. यासाठी यूपीआय पेमेंट (UPI Payment) मोड वापरला जात आहे. कोरोना काळात (Corona) प्रत्यक्ष व्यवहार करण्यावर मर्यादा आल्यानं अनेक जण दैनंदिन व्यवहारांसाठी ऑनलाइन पर्याय निवडत आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 8 सप्टेंबर : सध्याच्या काळात ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करण्याकडे कल वाढला आहे. यासाठी यूपीआय पेमेंट (UPI Payment) मोड वापरला जात आहे. कोरोना काळात (Corona) प्रत्यक्ष व्यवहार करण्यावर मर्यादा आल्यानं अनेक जण दैनंदिन व्यवहारांसाठी ऑनलाइन पर्याय निवडत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहारांचं (Online Transaction) प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. प्रत्यक्ष व्यवहारांच्या तुलनेत ऑनलाइन व्यवहार करणं सहजसोपं ठरत आहे; मात्र हे व्यवहार करण्यासाठी संबंधित युझरकडे इंटरनेट कनेक्शन (Internet Connection) असणं आवश्यक असतं. एखाद्या वेळी यूपीआयद्वारे पेमेंट करताना इंटरनेट स्लो (Slow) असेल तर पेमेंटची प्रक्रिया करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे व्यवहार करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. परंतु, यूपीआयद्वारे पेमेंट करताना प्रत्येकवेळी इंटरनेटची गरज असतेच असं काही नाही. यूपीआयद्वारे पेमेंट करण्यासाठी ऑफलाइन मोडही (Offline Mode) वापरता येतो. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता विस्तार आणि कोरोना काळात प्रत्यक्ष व्यवहारांवर आलेल्या मर्यादेमुळे आता बहुतांश नागरिक ऑनलाइन पेमेंटला प्राधान्य देत आहेत. त्यात मोबाइलद्वारे आर्थिक व्यवहार करण्यावर अधिक भर असल्याचं दिसून येत आहे. मोबाइलद्वारे (Mobile) आर्थिक व्यवहार जास्तकरून यूपीआयमोडद्वारे केले जातात. हे व्यवहार आता ऑफलाइन मोडद्वारेही करणं शक्य आहे. तुम्ही यूपीआयद्वारे पेमेंट करत असाल आणि तुमच्या फोनमधील इंटरनेट स्लो झालं असेल तर ऑफलाइन मोडवरूनही तुम्ही पेमेंट सहज करू शकता. यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स फॉलो कराव्यात. - आपल्या फोनमधला डायलर (Dialer) ओपन करावा आणि *99# वर कॉल करावा. - त्यानंतर एक मेसेज येईल. त्यात भाषा निवडण्याविषयी नमूद केलं असेल. तुम्हाला इंग्लिश ही भाषा निवडायची असेल तर 1 दाबावं. - त्यानंतर अनेक पर्याय असलेला एक मेन्यू दिसेल. तुम्हाला केवळ पैसे पाठवायचे असल्यानं तुम्ही 1 दाबावा. - ज्या कोणाला तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवणार आहात, त्यासाठीचा पर्याय सिलेक्ट करावा. यासाठी तुम्ही मोबाइल क्रमांकाचा वापर करणार असाल तर 1 दाबावा. - ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहात, त्या व्यक्तीचा अकाउंटशी जोडलेला मोबाइल क्रमांक सिलेक्ट करावा. - त्यानंतर रकमेचा आकडा आणि रक्कम कशासाठी पाठवत आहे, त्याबाबतचा मेसेज लिहून SEND वर क्लिक करा. - शेवटच्या स्टेपसाठी तुमचा यूपीआय पिन एंटर (UPI PIN) करा. - अशा प्रकारे इंटरनेटशिवायच, साध्या एसएमएसच्या माध्यमातून तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण होईल. - तुम्ही *99# डायल करून तुमचा यूपीआय डिसेबलही करू शकता. ही सर्व प्रक्रिया करण्यापूर्वी *99# चा वापर करून यूपीआय पेमेंट करण्याकरिता तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या बॅंक अकाउंटशी जोडला आहे ना याची खात्री करणं आवश्यक आहे. तरच तुम्ही या प्रक्रियेचा वापर करून इंटरनेटशिवाय आर्थिक व्यवहार करू शकता.
First published:

Tags: Digital currency, Internet, Upi

पुढील बातम्या