मराठी बातम्या /बातम्या /मनी /Kotak Mutual Fund: दरमहा 500 रुपये गुंतवून व्हा मालामाल, उद्या लाँच होतेय ही जबरदस्त योजना

Kotak Mutual Fund: दरमहा 500 रुपये गुंतवून व्हा मालामाल, उद्या लाँच होतेय ही जबरदस्त योजना

मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न इ. साठी तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास योजना बुधवारी 8 सप्टेंबर रोजी लाँच होत आहे.

मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न इ. साठी तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास योजना बुधवारी 8 सप्टेंबर रोजी लाँच होत आहे.

मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न इ. साठी तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास योजना बुधवारी 8 सप्टेंबर रोजी लाँच होत आहे.

नवी दिल्ली, 07 सप्टेंबर: मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न इ. साठी तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास योजना बुधवारी 8 सप्टेंबर रोजी लाँच होत आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचं तुमचं लक्ष्य असेल तर ही योजना तुमच्यासाठी खास आहे. कोटक म्यच्युअल फंड ही नवी स्कीम लाँच करत आहे. या योजनेचं नाव कोटक मल्टीकॅप फंड (Kotak Multicap Fund) असून यात तुम्ही दरमहा केवळ 500 रुपयांची गुंतवणूक देखील करू शकता. अर्थात तुम्ही छोटी गुंतवणू करून चांगला फायदा मिळवू शकता. या स्कीमला फंड हाऊसने Power of All in One असं नाव दिलं आहे. ही एक ओपन एंडेड स्कीम आहे. यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आमि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले जातील. ही न्यू फंड ऑफर खास आहे कारण यात स्टेबिलिटी आणि ग्रोथ दोन्हींचा विचार करण्यात आला आहे.

हे वाचा-Gold price today: पुन्हा स्वस्त झालं सोनं, चांदीचीही झळाळी उतरली; इथे तपासा भाव

दोन प्रकारे करता येईल गुंतवणूक

तुम्ही या Kotak Multicap Fund मध्ये एकरकमी आणि SIP अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू शकता. यामध्ये एकरकमी गुंतवणूक कमीतकमी 5000 रुपयांची आहे. यानंतर तुम्ही एकच्या पटीमध्ये कितीही गुंतवणूक करू शकता. शिवाय जर तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 500 रुपये दरमहा गुंतवू शकता. SIP साठी कमीतकमी 10 इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे जमा करणे आवश्यक आहे.

हे वाचा-इंधन दरामुळे सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

मुलांचं उच्च शिक्षण, निवृत्ती किंवा भविष्यात घर खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर Kotak Multicap Fund तुमच्या फायद्याचे आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना महत्त्वाची आहे. ही स्कीम वेगवेगळ्या मार्केट कॅपच्या इक्विटी आणि इक्विटीक रिलेटेड इन्स्ट्रूमेंट्समध्ये पैसे गुंतवेल. या स्कीमसाठी Nifty 500 Multicap 50:25:25 Total Returns Index हा बेंचमार्क आहे. महत्त्वाचा फायदा म्हणजे लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमुळे तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होईल.

NFO म्हणजे काय?

जेव्हा जेव्हा एखादी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (Asset Management Company) नवीन फंड लाँच करते, तेव्हा तो फंड फक्त काही दिवसांसाठी खुला असतो. फंड पोर्टफोलिओसाठी शेअर्स खरेदी करणे आणि त्याद्वारे पैसे गोळा करणे हा त्याचा हेतू आहे. एक प्रकारे, नवीन फंड सुरू करण्यासाठी पैसे उभे केले जातात. या संपूर्ण प्रक्रियेला न्यू फंड ऑफर म्हणतात. हे आयपीओसारखेच आहे, परंतु आयपीओ नाही.

First published: