नवी दिल्ली, 17 जून: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पेन्शन फंड रेग्यूलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension Scheme) च्या सब्सक्रायबर्सना त्यांचे पूर्ण पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. अर्थात आता NPS सब्सक्रायबर्स पेन्शन खात्यातून पूर्ण रक्कम काढू शकतात. PFRDA च्या मते ज्या सब्सक्रायबरचे एकूण पेन्शन कॉर्पस 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, ते अॅन्युटी खरेदी केल्याशिवाय त्यांचे पूर्ण पैसे काढू शकतात.
आता काय आहे नियम?
सध्याच्या काळात पेन्शन फंडमध्ये (Pension Fund) दोन लाखापेक्षा जास्त रक्कम असल्यास फंडधारक निवृत्त झाल्यानंतर किंवा 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जास्तीत जास्त 60 टक्के रक्कम एकाच वेळी काढू शकतात. आता PFRDA ने दिलेल्या माहितीनुसार या फंडात असणारी रक्कम 5 लाखापेक्षा कमी असल्यास ती पूर्ण काढता येईल, त्यांना कोणतीही विमा योजना खरेदी करण्याची आवश्यकता नाही. सध्या सेवानिवृत्ती वेळी किंवा वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम असणाऱ्या NPS खातेधारकांना विमा कंपनीद्वारे दिली जाणारी वार्षिक पेन्शन योजना खरेदी करणं अनिवार्य आहे.
हे वाचा-सोन्याच्या दागिन्यांबाबत महत्त्वाचे, या नियमानंतर तुमच्या ज्वेलरीचं काय होणार?
PFRDA ने काय म्हटलं?
PFRDA ने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, पेंशन फंडमधून वेळेआधी एकरकमी रक्कम काढण्याची मर्यादा देखील एक लाखावरुन अडीच लाख करण्यात आली आहे. तर नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात NPS मध्ये सहभागी होण्यासाठी सर्वोच्च वयोमर्यादा 70 आणि यातून बाहेर पडण्याची मर्यादा 75 वर्षे करण्यात आली आहे.
NPS म्हणजे काय?
एनपीएस ही एक सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे, जी केंद्र सरकारने 2004 मध्ये सुरू केली होती. 2009 पासून ही योजना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी देखील खुली करण्यात आली. ही योजना पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येते. पेन्शन फंड, पेन्शन फंडांच्या योजनांचा विकास आणि नियमन करुन वृद्धापकाळाच्या उत्पन्नाच्या सुरक्षिततेस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यायोगे संबंधित किंवा संबंधित घटनांमध्ये ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ही स्थापना केली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pension, Pension funds, Pension scheme