मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PF Account : आधार आणि UAN लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, कसं कराल?

PF Account : आधार आणि UAN लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, कसं कराल?

आजअखेर (30 नोव्हेंबर 2021) तुमचा यूएएन (UAN) आधार क्रमांकाशी लिंक केला नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आधार आणि यूएएन लिंक नसल्यास, 1 डिसेंबर 2021 पासून तुमची कंपनी तुमच्या ईपीएफ (EPF) अकाउंटमध्ये मंथली कॉन्ट्रिब्युशन करू शकणार नाही.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 नोव्हेंबर : कुठल्याही सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) किती महत्त्वाचा असतो, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पीएफ अकाउंटशी (PF Account) निगडित असलेल्या सर्व लाभ मिळावेत यासाठी आपलं पीएफ अकाउंट वेळोवेळी अपडेट ठेवणं गरजेचं आहे. पीएफ (PF Account) अकाउंटधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपला आधार क्रमांक (Aadhaar number) आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (Universal account number) लिंक केलेला नसेल, अशांसाठी आज शेवटची संधी आहे. आजअखेर (30 नोव्हेंबर 2021) तुमचा यूएएन (UAN) आधार क्रमांकाशी लिंक केला नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आधार आणि यूएएन लिंक नसल्यास, 1 डिसेंबर 2021 पासून तुमची कंपनी तुमच्या ईपीएफ (EPF) अकाउंटमध्ये मंथली कॉन्ट्रिब्युशन करू शकणार नाही. याशिवाय कर्मचाऱ्याला पीएफ काढणंही कठीण होईल.

आपला आधार क्रमांक आणि यूएएन क्रमांक लिंक करण्यासाठी पुढे काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी केल्यास तुमचे दोन्ही क्रमांक एकमेकांशी लिंक होतील.

ईपीएफओ वेबसाइटद्वारे (EPFO Website) लिंकिंग

1. सर्वांत अगोदर ईपीएफओच्या (EPFO) अधिकृत वेबसाइटवर जा.

2. त्यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या अॅड्रेसवर जावं.

3. त्यानंतर आपला युएएन (UAN) आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करा.

4. त्यानंतर मॅनेज (Manage) सेक्शनमध्ये असलेल्या केवायसी (KYC) पर्यायावर क्लिक करा.

5. त्या ठिकाणी तुम्हाला ईपीएफ (EPF) अकाउंटसोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठीचे ऑप्शन दिसतील.

6. 'आधार' हा ऑप्शन निवडा आणि त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि आधार कार्डवर असलेलं नाव टाइप करून 'सर्व्हिस'वर क्लिक करा.

7. यानंतर तुम्ही भरलेली माहिती सेव्ह होईल आणि तुमचं आधार यूआयडीएआयच्या (UIDAI) डेटासोबत व्हेरिफाय होईल.

8. तुमची KYC माहिती योग्य असेल, तर तुमचा आधार क्रमांक EPF अकाउंटशी सहज लिंक होईल.

'Omicron Variant' मुळे 'या' क्रिप्टोकरन्सीत मोठी उसळी, तीन दिवसात 900 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स

उमंग अॅपच्या (UMANG App) मदतीने लिंकिंग

1. सर्वांत अगोदर गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) किंवा अॅपल आयओएसवरून (Apple iOS) उमंग अॅप डाउनलोड करा.

2. त्यात ईपीएफओ लिंकवर क्लिक करा.

3. ‘ईकेवायसी सर्व्हिसेस’ ऑप्शनवर टॅप करा.

4. त्यानंतर ‘आधार सीडिंग’ ऑप्शन निवडा.

5. तिथे यूएएन (UAN) नंबर टाका. त्यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल.

6. त्यानंतर तिथे मागितलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.

7. तुमचा आधार क्रमांक यूएएन क्रमांकाशी लिंक होईल.

देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर किती देतात व्याजदर; जाणून घ्या माहिती

वरील दोन पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमचा आधार नंबर आणि यूएएन नंबर एकमेकांशी लिंक करू शकता. तुम्हाला स्वत: ही प्रक्रिया करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही एखाद्या विश्वासू जाणकार व्यक्तीची मदतही घेऊ शकता.

First published:

Tags: Aadhar card, Pan card, PF Amount