मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Special Story : देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर नक्की किती देतात व्याजदर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Special Story : देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर नक्की किती देतात व्याजदर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

जितकं व्याज अधिक तितके रिटर्न्स जास्त असं साधं गणित यामागं असतं.

जितकं व्याज अधिक तितके रिटर्न्स जास्त असं साधं गणित यामागं असतं.

जितकं व्याज अधिक तितके रिटर्न्स जास्त असं साधं गणित यामागं असतं.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 29 नोव्हेंबर: बचत (Saving) आणि गुंतवणूक (Investment) हा आर्थिक नियोजनातला महत्त्वाचा घटक असतो. भविष्यकाळातल्या गोष्टींसाठी तरतूद म्हणून या घटकाकडे पाहिलं जातं. गुंतवणुकीतून अधिकाधिक उत्पन्न मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते; मात्र याकरिता सुरक्षित पर्यायांचा विचार करणं हे अधिक फायदेशीर ठरतं. कारण सुरक्षित गुंतवणुकीत (Investment) जोखीम कमी आणि मिळणाऱ्या परताव्याची हमी असते. सध्याच्या काळात शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडासारखे पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. यातून रिटर्न्स (Returns) चांगले मिळत असले, तरी जोखीम अधिक असते. त्यामुळे अनेक जण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बॅंका किंवा वित्तीय संस्थांमध्ये बचतीस प्राधान्य देतात. कोणत्याही प्रकारची बचत किंवा गुंतवणूक करताना काही महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात. त्यात व्याजदर, कालावधी, बाजाराची स्थिती यांचा समावेश असतो. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीतून मिळणारे रिटर्न्स व्याजदरावर (Interest Rates) अवलंबून असतात. जितकं व्याज अधिक तितके रिटर्न्स जास्त असं साधं गणित यामागं असतं.

बहुतांश जण रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) आणि फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) या पर्यायांना अधिक प्राधान्य देताना दिसतात. आज रिकरिंग डिपॉझिटसाठी अनेक बॅंका आणि वित्तीय संस्थांच्या विविध योजना उपलब्ध आहेत. या माध्यमातून दरमहा एक ठराविक रक्कम विशिष्ट कालावधीसाठी गुंतवता येते. रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुरू केल्यानंतर संबंधित बॅंकेच्या व्याज दरानुसार गुंतवलेल्या रकमेवर व्याज मिळतं. देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर विशिष्ट कालावधीकरिता वेगवेगळा व्याजदर देतात. सर्वसाधारणपणे बचत कालावधीनुसार प्रमुख बॅंकांचा सध्याचा व्याज दर किती आहे, याविषयी माहिती जाणून घेऊ या. अर्थात, या योजनांचे व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. त्यामुळे प्रत्यक्ष आरडी सुरू करण्यापूर्वी बँकेत जाऊन किंवा संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून व्याजदर तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

GST Rules : नवीन व्‍यवसाय सुरू करताय? जीएसटीचे नियम माहिती करून घ्या

बचतीची सवय व्हावी, हा रिकरिंग डिपॉझिटचा उद्देश असतो. बहुतांश बॅंका आरडीवर ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज देतात. खासगी, सहकारी तसंच शासकीय बॅंकांमध्ये रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुरू करून बचतीस प्रारंभ करू शकता.

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) तुम्ही अगदी 100 रुपये डिपॉझिट करून 12 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीकरिता आरडी (RD) अकाउंट सुरू करू शकता. ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर दिला जातो. 2021 या आर्थिक वर्षात एसबीआयमध्ये आरडीत 1 वर्ष ते 2 वर्षापेक्षा कमी कालावधीकरिता 5 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 5.50 टक्के व्याजदर दिला जात आहे. तसंच 5 ते 10 वर्षं कालावधीकरिता सर्वसामान्य नागरिकांना 5.40 तर ज्येष्ठ नागरिकांना 6.20 टक्के व्याजदर दिला जात आहे.

बॅंक ऑफ इंडियानं (Bank Of India) वैयक्तिक, तसंच अल्पवयीन, अंध आणि निरक्षर व्यक्तींना रिकरिंग डिपॉझिट खातं सुरू करण्याची सुविधा दिली आहे. या माध्यमातून संबंधित नागरिक 180 दिवस ते 10 वर्षांपर्यंत बचत करू शकतात. बॅंकेनं आरडीसाठी ग्रामीण आणि निमशहरी भागात किमान मासिक हप्ता 100 रुपये तर शहर आणि मेट्रो सिटीसाठी किमान 500 रुपये मासिक हप्ता निश्चित केला आहे. 2021 या आर्थिक वर्षामध्ये बॅंक 180 दिवस ते 10 वर्षापर्यंतच्या बचत कालावधीकरिता 4.75 ते 5.30 टक्के व्याज देत आहे.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया (Central Bank Of India) सर्वसामान्य नागरिकांना आरडीवर 4.25 ते 5.10 टक्के व्याज देत आहे. या बॅंकेनं सेंट स्वशक्ती फ्लेक्झी रिकरिंग डिपॉझिट योजनादेखील सुरू केली आहे. बॅंक 8 जानेवारी 2021च्या निर्णयानुसार आरडीत 1 वर्ष परंतु दोन वर्षापेक्षा कमी कालावधीकरिता दोन कोटीपेक्षा कमी रकमेवर 4.90 टक्के तर 8 डिसेंबर 2020 च्या निर्णयनुसार (रेपोरेट लिंक) 2 ते 10 कोटी रुपयांवर 3.50 टक्के व्याज दर देत आहे. कालावधीनुसार योजनेतील व्याजदराची अधिक माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.

एचडीएफसी बॅंक (HDFC Bank) 2021 या आर्थिक वर्षात 6 महिने ते 10 वर्ष कालावधीकरिता रिकरिंग डिपॉझिटवर सर्वसामान्य नागरिकांना 3.50 ते 5.50 टक्के असा व्याजदर देत असून, ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के व्याज अधिक दिलं जात आहे. बॅंकेनं एनआरआयसाठीही (NRI) आरडी सुविधा उपलब्ध करून दिली असून, 12 महिने ते 10 वर्षाच्या कालावधीकरिता बचत केल्यास त्यावर एनआरआय खातेदाराला 5.10 ते 5.50 टक्के व्याज दिले जात आहे. कोणताही खातेदार किमान 1000 रुपयांपासून बचतीस प्रारंभ करू शकतो.

अॅक्सिस बॅंक (Axis Bank) 2021 या आर्थिक वर्षात 6 महिने ते 10 वर्ष कालावधीकरिता 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या रिकरिंग डिपॉझिट वर 4.40 ते 5.75 टक्के व्याज देत आहे. कालावधीनिहाय व्याजदराची अधिक माहिती बॅंकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) आयविश आरडी योजनेंतर्गत 2021 या आर्थिक वर्षात 6 महिने ते 10 वर्ष कालावधीकरिता 3.50 ते 5.50 टक्के यादरम्यान व्याजदर आरडीसाठी देत असून, बॅंकेने शॉर्टटर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म आरडीसाठी सर्वसामान्य नागरिकांकरिता वेगवेगळे व्याज दर ठेवले आहेत. याची सविस्तर माहिती बॅंकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त आरडीत 2 वर्षं कालावधीसाठी बचतीवर लक्ष्मी विलास बॅंक (Laxmi Vilas Bank) आणि येस बॅंक (YES Bank) 7.50 टक्के असा सर्वोच्च दर देत आहेत. तसंच 3 आणि 4 वर्षांकरिता आरडीत बचत केल्यास त्यावर लक्ष्मी विलास बॅंक 7.50 टक्के व्याज दर देत आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी NAV म्हणजे काय? समजून घ्या नाहीतर तोटा होईल

देशातली पोस्ट ऑफिसेस (Post Office) म्हणजेच टपाल कार्यालयांमध्ये आरडीची सुविधा उपलब्ध असते. येथे आरडीवर 1 ते 3 वर्षं कालावधीकरिता 5.5 टक्के, तर 5 वर्षं कालावधीकरिता 6.7 टक्के व्याजदर दिला जातो.

अन्य खासगी, सहकारी तसंच शासकीय बॅंकांच्या रिकरिंग डिपॉझिटचे सध्याचे व्याजदर आणि कालावधीचा तपशील संबंधित बॅंकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असतो.

First published:

Tags: Money, Small investment business