मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'Omicron Variant' मुळे 'या' क्रिप्टोकरन्सीत मोठी उसळी, तीन दिवसात 900 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स

'Omicron Variant' मुळे 'या' क्रिप्टोकरन्सीत मोठी उसळी, तीन दिवसात 900 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स

(Omicron) या नव्या वेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, ओमिक्रॉन नावाच्या अत्यंत कमी लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीचे यामुळे दिवस बदलले आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 30 नोव्हेंबर : कोरोनाचं सावट (coronavirus) कमी होताना दिसत असताना आता नव्या ओमिक्रॉन वेरिएंटमुळे (Corona News variant omicron) पुन्हा एकदा जग संकटात सापडलं आहे. कोविड-19 च्या विविध प्रकारांपैकी ओमिक्रॉन वेरिएंट सर्वात धोकादायक मानला जातो. गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत (South Africa) प्रथम समोर आलेला B.1.1.529 (Omicron) या नव्या वेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, ओमिक्रॉन नावाच्या अत्यंत कमी लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीचे यामुळे दिवस बदलले आहेत.

ओमिक्रॉन क्रिप्टोकरन्सीने गेल्या काही दिवसांत 900 टक्के वाढ केली आहे आणि या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे 10 पट वाढवले ​​आहेत. CoinMarketCap च्या डेटानुसार, 27 नोव्हेंबर रोजी Omicron cryptocurrency सुमारे $ 65 (4,883) च्या किमतीवर ट्रेड करत होती. त्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर त्याची किंमत सातत्याने वाढत आहे.

देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर किती देतात व्याजदर; जाणून घ्या माहिती

29 नोव्हेंबर रोजी या क्रिप्टोकरन्सीची किंमत 689 डॉलर (सुमारे 51,765 रुपये) च्या ऑलटाईम हायवर पोहोचली आहे. अशाप्रकारे, अवघ्या तीन दिवसांत या क्रिप्टोकरन्सीने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 945 टक्के परतावा दिला आहे.

27 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत, Omicron cryptocurrency ची किंमत थोडीशी कमी होऊन 612.67 डॉलर (सुमारे 45,972 रुपये) झाली होती.

RD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय; मग तुम्ही हे वाचायलाच हवं

23 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराचे पहिले प्रकरण आढळून आले होते. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिका आणि इतर शेजारील देशांच्या उड्डाणांवर आधीच बंदी घातली आहे.

First published:

Tags: Cryptocurrency, Investment, Money