Home /News /money /

Petrol Price Today: आज किती रुपयांत खरेदी करता येणार पेट्रोल-डिझेल? इथे वाचा लेटेस्ट दर

Petrol Price Today: आज किती रुपयांत खरेदी करता येणार पेट्रोल-डिझेल? इथे वाचा लेटेस्ट दर

Petrol and Diesel Price Today

Petrol and Diesel Price Today

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बुधवारी देखील कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीसह महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) आज स्थिर आहेत.

    नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बुधवारी देखील कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीसह महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) आज स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी इंधनदरात रविवारी 10 ते 15 पैशांची कपात केली होती. सोमवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel) कोणताही बदल झालेला नव्हता. दररोज सकाळी सहा वाजता तेल मार्केटिंग कंपन्या इंधनाचे दर जारी करतात. सरकारी तेल कंपनी IOCL ने जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनुसार आज मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत सौदी अरेबियाने मंगळवारी अशी माहिती दिली आहे की ते आशियायी देशांना स्वस्तात क्रूड देणार आहेत. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊनही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. आजही किंमती स्थिर आहेत. हे वाचा-मुंबईतील आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई, भरावा लागणार 2 लाखांचा दंड सरकारची होत आहे चांगली कमाई पेट्रोल आण डिझेलसारख्या पेट्रोलियम उत्पादनांवरील टॅक्समधून सरकारची चांगली कमाई होत आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांवर लागणाऱ्या केंद्रीय उत्पादन कर कलेक्शनमध्ये (Centre’s excise collection) 48 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. हे कलेक्शन 1 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? (Petrol-Diesel Price on 8th Sept 2021) >> दिल्ली पेट्रोल  101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर SMS च्या माध्यमातून तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. हे वाचा-दरमहा 500 रुपये गुंतवून व्हा मालामाल, उद्या लाँच होतेय ही जबरदस्त योजना तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petro price hike, Petrol, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या