मराठी बातम्या /बातम्या /मनी /चांगली बातमी! सणासुदीपूर्वी 6 कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार, आताच चेक करा

चांगली बातमी! सणासुदीपूर्वी 6 कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार, आताच चेक करा

कोरोना साथीची दुसरी लाट ओसरत असल्यानं सर्वत्र निर्बंध शिथील झाल्यानं अनेक ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. लोक बाहेर जाऊ शकत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहात आणखी भर घालणारी बातमी केंद्र सरकारनं (Central Government) दिली आहे.

कोरोना साथीची दुसरी लाट ओसरत असल्यानं सर्वत्र निर्बंध शिथील झाल्यानं अनेक ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. लोक बाहेर जाऊ शकत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहात आणखी भर घालणारी बातमी केंद्र सरकारनं (Central Government) दिली आहे.

कोरोना साथीची दुसरी लाट ओसरत असल्यानं सर्वत्र निर्बंध शिथील झाल्यानं अनेक ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. लोक बाहेर जाऊ शकत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहात आणखी भर घालणारी बातमी केंद्र सरकारनं (Central Government) दिली आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : सध्या देशात सणासुदीचा कालावधी असल्यानं उत्साहाचं वातावरण आहे. कोरोना साथीची दुसरी लाट ओसरत असल्यानं सर्वत्र निर्बंध शिथील झाल्यानं अनेक ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. लोक बाहेर जाऊ शकत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहात आणखी भर घालणारी बातमी केंद्र सरकारनं (Central Government) दिली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सरकारनं 8.5 टक्के व्याजदर (Interest Rate) जाहीर केला असून, भविष्य निधी संघटनेशी संबंधित (EPFO) सहा कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात हे व्याजाचे पैसे त्वरेनं जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं ईपीएफओनं (EPFO) ट्विटद्वारे जाहीर केलं आहे.

    2019-20 या आर्थिक वर्षात, केवायसीमधील (KYC) अडथळ्यामुळे, अनेक खातेदारांना व्याज जमा होण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. यंदा मात्र अशी प्रतीक्षा करावी लागणार नाही. सणाच्या आधी पैसे खात्यात जमा होतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या खात्यात हे पैसेही जमा झाले असतील.

    तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का याची खात्री करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, तुम्हाला ईपीएफओच्या संदेशाद्वारे पीएफचा तपशील मिळेल. यासाठी तुमचा यूएएन, पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे.

    हे ही वाचा-कमी गुंतवणूक अन् लाखो रुपये नफा; मोत्याच्या शेतीसाठी सरकारही देतंय अनुदान

    तुमचा यूएएन (UAN) नंबर नोंदणी केलेला असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारे माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 7738299899 वर EPFOHO असा मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे माहिती मिळेल. हिंदी, इंग्रजी, पंजाबी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्येही ही सेवा उपलब्ध आहे.

    ईपीएफओच्या वेबसाइटवरूनही तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक तपासता येईल. याकरता तुम्हाला epfindia.gov.in वर लॉग इन करून ई-पासबुकवर क्लिक करा. passbook.epfindia.gov.in वर एक नवीन पेज ओपन होईल. इथं तुमचे युजरनेम, UAN नंबर , पासवर्ड आणि कॅप्चा भरल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर मेंबर आयडी निवडावा लागेल. त्यानंतर ई-पासबुकवर ईपीएफ खात्यातील शिल्लक दिसेल. तुमच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी उमंग अॅपचाही वापर करता येईल. यासाठी उमंग अॅप (Umang APP) ओपन करून ‘ईपीएफओ’वर क्लिक करा. एम्प्लॉयी सेंट्रिक सेवा पर्यायावर (Employee Centric Services) क्लिक करा. View Passbook वर क्लिक करा. यूएएन नंबर आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरा. तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक दिसेल.

    लवकर तपासा तुमची शिल्लक रक्कम आणि त्याचा फायदाही घ्या.

    First published: