• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: पेट्रोलचे दर शंभरीपार! मुंबईत काय आहे आजचा भाव?

Petrol Price Today: पेट्रोलचे दर शंभरीपार! मुंबईत काय आहे आजचा भाव?

Petrol Price Today: IOCL ने आज बुधवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत  (Petrol-diesel price today) आज कोणताही बदल झालेला नाही. आज सलग 16व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol diesel price) स्थिर आहेत. गेल्या 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात 15 पैशांची सवलत दिली होती. यानंतर सलग दर स्थिर आहेत. IOCL च्या मते, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.19 रुपये आणि डिझेलचे दर 88.62 रुपये प्रति लीटर आहेत. तर आज मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत (Petrol and diesel are not covered by GST) येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 45 व्या GST काउन्सिल बैठकीनंतर वित्त मंत्री निर्मला सीमारामन यांनी यामध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. (Nirmala Sitharaman 45th GST Council meeting in Lucknow). वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काउन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की, जीएसटी काउन्सिलने सांगितलं की, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची ही योग्य वेळ नाही. काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? (Petrol-Diesel Price on 22nd Sept 2021) >> दिल्ली पेट्रोल  101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर हे वाचा-1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंट पद्धतीत मोठे बदल; RBI हे नवे नियम लागू करणार >> नोएडा पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर SMS च्या माध्यमातून तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.  तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-300 कोटींची संपत्ती, बुर्ज खलिफात दोन मजले; या उद्योजकाने एका क्षणात गमावले सारे तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: