नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : कोरोना काळात नागरिकांना भासणारी पैशांची गरज लक्षात घेत मोदी सरकारने (Union Government's big decision on PF withdrawal) भविष्य निर्वाह निधीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता वैद्यकीय कारणांसाठी आपल्या प्रॉव्हिडंट फंडातील रक्कम वापरणं (PF amount) कर्मचाऱ्यांना शक्य होणार आहे. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रियादेखील बदलण्यात (Legal procedure for PF withdrawal modified) आली असून नागरिकांना आपला निधी अधिक सोप्या पद्धतीने मिळवता यावा, यासाठी कायद्यात काही बदल करण्यात आले आहेत.
कोरोनासह इतर कुठल्याही वैद्यकीय कारणासाठी आता 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम प्रॉव्हिडंट फंडातून काढणं शक्य होणार आहे. यापूर्वीदेखील अशी रक्कम काढता येत होती, मात्र हीच प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत होणार आहे. या प्रक्रियेत मूलभूत दोन बदल करण्यात आले आहेत.
वेळ होणार कमी
वैद्यकीय कारणांसाठी प्रॉव्हिडंट फंडातील रक्कम काढण्यासाठी अर्ज काढल्यानंतर तीन दिवसांत ती रक्कम बँक खात्यात जमा होते. मात्र आता हा वेळ कमी करण्यात आला असून तो एक तासावर आणण्यात आला आहे. यापुढे वैद्यकीय काऱणासाठी रक्कम काढली, तर ती एका तासात तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
हे वाचा - गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, पाहा PHOTOs
बिलांची गरज नाही
यापूर्वी वैद्यकीय कारणांसाठी पैसे काढताना वैद्यकीय बिले जोडावी लागत असत. मात्र ही अटदेखील काढून टाकण्यात आली आहे. वैद्यकीय कारणासाठी पैसे हवे असतील, तर आता कुठलंही बिल किंवा पुरावा देण्याची गरज नाही. केवळ वैद्यकीय कारणासाठी ही रक्कम काढत असल्याचा ऑप्शन निवडून तुम्हाला पैसे मिळवणं शक्य होणार आहे.
अशी असेल प्रक्रिया
यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल आणि एका तासात पैसे तुमच्या खात्यात जमा होतील
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pf, PF Amount, PF Withdrawal