Home » photogallery » lifestyle » RICH TO RAGS DUBAI BUSINESSMAN BAVAGUTHU RAGHURAM SHETTY NET WORTH 2 FLOORS BURJ KHALIFA LOST WEALTH MHAS
300 कोटींची संपत्ती, बुर्ज खलिफात होते दोन मजले; या भारतीय उद्योजकाने एका क्षणात सगळं गमावलं!
जगातील काही मोजक्या श्रीमंत लोकांमध्ये एकेकाळी बावगुथु रघुराम शेट्टी यांचाही समावेश होता. परंतु आता त्यांनी बरंच काही गमावलं आहे. ते कसं आणि काय नेमकं घडलं? याविषयी आपण जाणून घेऊयात.
|
1/ 5
एकेकाळी बावगुथु रघुराम शेट्टी हे भारतासह UAE तील श्रीमंत असे उद्योजक होते. त्यांच्याकडे तीन बिलियन म्हणजे 300 कोटींहून अधिक संपत्ती होती. (Image Credit: CNBC-TV18)
2/ 5
शेट्टी हे यशाच्या शिखरावर असताना त्यांनी थेट बुर्ज खलिफात दोन मजले विकत घेतले होते. (Image Credit: Cartoq)
3/ 5
बावगुथु रघुराम शेट्टी यांनी त्यांच्या आर्थिक प्रगतीच्या शिखरावर असताना 2014 मध्ये एका अरेबियन अब्जाधीशाकडून खाजगी जेट विमानांचे 50 टक्के अधिकार 4.2 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले होते. (Image Credit: Twitter)
4/ 5
ज्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती तेव्हा त्यांनी जगप्रसिद्ध बुर्ज कालिफा टॉवरमध्ये चक्क दोन संपूर्ण मजले खरेदी केले होते. (Image Credit: DNA India)
5/ 5
परंतु 2020 मध्ये Muddy Waters Research ने त्यांच्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप केल्याने त्यांची कंपनी अडचणीत सापडली आणि त्यातच त्यांनी सर्व काही गमावलं. (Image Credit: Facebook)