• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-diesel Price Today: अजूनही पेट्रोल शंभरीपारच! घरबसल्या मोबाइलवरुन जाणून घ्या इंधनाचे दर

Petrol-diesel Price Today: अजूनही पेट्रोल शंभरीपारच! घरबसल्या मोबाइलवरुन जाणून घ्या इंधनाचे दर

गेल्या महिन्यात सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते. नोव्हेंबर महिन्यात मात्र (Petrol-Diesel Rates in November) पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज 17 नोव्हेंबर रोजीचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: गेल्या महिन्यात सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते. नोव्हेंबर महिन्यात मात्र (Petrol-Diesel Rates in November) पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज 17 नोव्हेंबर रोजीचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज बुधवारी देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. यूपीमधील अनेक शहरांसह काही ठिकाणी पेट्रोल 100 रुपये प्रति लीटरपेक्षा कमी दराने मिळते आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे. हे वाचा-सावधान! परदेशातून सोनं आणताना जाणून घ्या सीमा शुल्क विभागाचे नियम; अन्यथा... 17 नोव्हेंबर रोजी इंधनाचे दर (Petrol Diesel Price on 17 November 2021) >> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर >> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर या शहरांत 100 रुपयांपेक्षाही कमी आहेत पेट्रोलचे दर >> पोर्ट ब्लेयर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 87.01 रुपये प्रति लीटर >> ईटानगर पेट्रोल 92.02 रुपये आणि डिझेल 79.63 रुपये प्रति लीटर >> चंदीगड पेट्रोल 94.23 रुपये आणि डिझेल 80.9 रुपये प्रति लीटर >> आयजोल पेट्रोल 94.26 रुपये आणि डिझेल 79.73रुपये प्रति लीटर >> लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.8 रुपये प्रति लीटर हे वाचा-Online सेलमध्ये खरंच कमी किमतीत वस्तू मिळतात का? हे आहे डिस्काउंटचं गणित >> शिमला पेट्रोल 95.78 रुपये आणि डिझेल 80.35 रुपये प्रति लीटर >> पणजी पेट्रोल 96.38 रुपये आणि डिझेल 87.27 रुपये प्रति लीटर >> गंगटोक पेट्रोल 97.7 रुपये आणि डिझेल 82.25 रुपये प्रति लीटर >> रांची पेट्रोल 98.52 आणि डिझेल 91.56 रुपये प्रति लीटर >> शिलाँग पेट्रोल 99.28 आणि डिझेल 88.75 रुपये प्रति लीटर >> देहरादून पेट्रोल 99.41 आणि डिझेल 87.56 रुपये प्रति लीटर >> दमण पेट्रोल 93.02 आणि डिझेल 86.9 रुपये प्रति लीटर दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. हे वाचा-MHADA चं घर मिळावं यासाठी काय करायचं? सगळी माहिती एका क्लिकवर अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: