• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • MHADA चं घर घेण्याचा विचार करताय? ही माहिती तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यास मदत करेल

MHADA चं घर घेण्याचा विचार करताय? ही माहिती तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यास मदत करेल

How to apply for mhada lottery : म्हाडामध्ये घर लागावं यासाठी एका व्यक्तीनं तब्बल 83 अर्ज केले होते. यावरुन म्हाडाच्या घराचं महत्त्व लक्षात येईल. तुम्हीही म्हाडाचं घर घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी उपयुक्त आहे.

 • Share this:

  मुंबई, 16 नोव्हेंबर: स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्यानं अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) म्हणजेच म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरत आहे. म्हाडा (How to apply for MHADA Lottery) तुम्हाला तुमच्या आवाक्यात घर उपलब्ध करुन देत आहे. एका व्यक्तीनं म्हाडा लॉटरीत घर मिळावं यासाठी स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावाने तब्बल 83 अर्ज दाखल केले होते. तेही उच्च उत्पन्न गटात. यासाठी त्याला अनामत रक्कम म्हणून 62 लाख 25 हजार रुपये भरावे लागले होते. यावरुन आपल्याला अंदाज आला असेल की म्हाडाच्या घरांना किती महत्त्व आहे.

  पण, मग म्हाडात घर मिळवण्यासाठी काय करावं लागतं? किती रुपये भरावे लागतात? गृहकर्ज कुठून मिळते? आपल्याला लॉटरीत (mhada lottery) घर लागण्याची शक्यता किती आहे? आपण भरलेली अनामत रक्कम माघारी मिळते का? म्हाडाच्या बांधकामाचा दर्जा कसा असतो? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील ना? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.

  काय आहे MHADA? महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. याची स्थापना 5 डिसेंबर 1977 रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधारणा मंडळ आणि मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ यांचे एकत्रिकरण करून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये उच्च, मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे.

  मुंबईत घर परवडेना ! Shiv Sena आमदाराने हक्काच्या घरासाठी केला MHADA कडे अर्ज

  म्हाडा अंतर्गत लॉटरी प्रकार : म्हाडा गृहनिर्माण योजना कोकण मंडळ मुंबई बोर्ड म्हाडा लॉटरी 2020 पुणे बोर्ड म्हाडा लॉटरी योजना 2020 औरंगाबाद मंडळासाठी म्हाडा गृहनिर्माण योजना नाशिक बोर्ड म्हाडा गृहनिर्माण योजना नागपूर मंडळ म्हाडा गृहनिर्माण योजना अमरावती मंडळ म्हाडा गृहनिर्माण योजना वरील योजनेअंतर्गत तुम्ही पूर्ण करत असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही शहरात अर्ज करू शकता.

  म्हाडा लॉटरीसाठी (Mhada lottery) पात्रता काय आहे? म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेले अर्जदार (LIG) कमी उत्पन्न श्रेणी अंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत. 50 हजार ते 75 हजार रुपये मासिक उत्पन्न असलेले अर्जदार मध्यम उत्पन्न गट (MIG) श्रेणी अंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत. मासिक उत्पन्न 75,000 (HIG) पेक्षा जास्त असलेले अर्जदार उच्च उत्पन्न गट श्रेणीत अर्ज करू शकतात.

  Real Estate: स्वप्नातलं घर खरेदी करताय? कागदपत्रांसदर्भात अजिबात विसरू नका या 5 गोष्टी

  अर्ज करण्याची प्रक्रिया How to apply for mhada lottery म्हाडा लॉटरी स्कीमच्या वेबसाईटवर लॉग ऑन करा. सर्वप्रथम तुमचे युजरनेम तयार करावे लागते, त्यासाठी तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन करा. यावेळी तुम्हाला तुमची काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यासाठी चालू असलेला मोबाईल नंबर वापरा. प्रोफाईल तयार झाल्यानंतर लॉगइन करून म्हाडाच्या विविध स्कीम्स पाहू शकता. इथं लॉटरी हा पर्याय निवडून, तुमचे स्थळ निश्चित करा. यावेळी तुमचे सध्याचे उत्पन्न लिहा आणि तुमच्या बँकेची इतर माहिती द्या. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल. ही फी ऑनलाईन अथवा DD ने भरू शकता.

  अनामत रक्कम परत मिळते का? प्रत्येक उत्पन्न गटानुसार वेगवेगळी अनामत रक्कम भरावी लागते. उदाहरणार्थ अल्प उत्पन्न गटासाठी एका अर्जासाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम आहे. यासोबत तुम्हाला 500 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागते. लॉटरीमध्ये नंबर लागला नाही तर 10 हजार अनामत रक्कम तुमच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केली जाते. मात्र, 500 रुपये प्रोसेसिंग फी पुन्हा मिळत नाही.

  आवश्यक कागदपत्रे : Required documents अर्जदाराचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र पॅन कार्ड बँक पासबुक तपशील डॉमासाईल मोबाईल नंबर पासपोर्ट आकार फोटो ई – मेल आयडी

  घर घेणाऱ्यांमध्ये वाढतेय Millennials ची संख्या, तुम्हीही विचार करताय तर फॉलो करा या 5 टिप्स

  म्हाडामध्ये घर लागण्याची शक्यता किती आहे? सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे एका व्यक्तीने घर मिळवण्यासाठी 83 अर्ज दाखल केले होते. यावरुन तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की म्हाडात लॉटरी लागणे याला नशीबचं म्हणावं लागेल. तरीही आकडेवारी द्यायची झाली तर 1 हजार 384 घरांसाठी 1 लाख 65 हजार अर्ज आले होते. म्हाडामध्ये घर लागणे हा नशीबाचा खेळ समजला जातो. कारण, लोकं चार-चार, पाच-पाच वर्षांपासून म्हाडासाठी अर्ज करताना दिसत आहेत. अनेकजण तर कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावाने अर्ज भरत असतात. तरीही घर मिळत नाही तर दुसरीकडे पहिल्यांदाच अर्ज केला आणि लॉटरी लागली अशीही उदाहरणे आहेत. आता जाता जाता.. ज्या व्यक्तीने 83 अर्ज केले होते, त्यांना नशीबाने एक घर पंतनगर, घाटकोपर परिसरात मिळालं बर का..

  लॉटरी लागावी यासाठी काय करावे? What to do to win Mhada lottery? लॉटरी मिळेल की नाही हे सांगणे अवघड आहे. मात्र, तुम्ही थोडा अभ्यास करुन स्पर्धा नक्कीच कमी करू शकता. म्हाडामध्ये जशी वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी घरे आहेत. त्याप्रमाणे काही गटांसाठी आरक्षित घरे आहेत. जसे की गिरणी कामगार, पत्रकार इत्यादी.. तुम्ही अशाच एखाद्या विशिष्ट गटात बसत असाल तर तिथं नक्कीच अर्ज करा जेणेकरुन लॉटरी लागण्याचे चान्सेस वाढतील.

  लॉटरी लागल्यानंतर काय? म्हाडामध्ये लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला एका आठवड्यात जाऊन संबंधित कार्यालयाला भेट द्यायची आहे. तिथं आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर घराच्या किमतीच्या 10 टक्के रक्कम भरायची असते. यानंतर तुम्हाला संबंधित कार्यालयाकडून याचे प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्र बँकेत सादर करुन गृहकर्ज मिळवू शकता.

  लॉटरी लागल्यानंतर घराचा ताबा लगेच मिळतो का? तुम्ही कोणत्या योजनेत अर्ज केला आहे? त्या प्रोजक्टची स्थिती काय आहे? यावर सर्व अवलंबून असते. अनेक प्रोजेक्ट हे निर्माणाधीन असतात. तर काही प्रोजेक्ट पूर्णपणे तयार असतात. त्यामुळे घराचा ताबा लगेच मिळणार की नाही? हे तुमच्या प्रोजेक्टवर अलवंबून आहे.

  म्हाडाच्या बांधाकाचा दर्जा कसा असतो? ही योजना सरकारी असल्यामुळे बांधकामाचा दर्जा चांगलाच असतो. मात्र, अनेक प्रोजक्ट हे खाजगी बिल्डर बांधत असतात. त्यामुळे तुम्ही साईटला भेट देऊ शकता. निर्माणाधीन साईटवर जाऊन तुम्ही याची माहिती काढू शकता. तुम्हाला याचा पूर्णपणे अधिकार आहे.

  Published by:Rahul Punde
  First published: