Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Online shopping सेलमध्ये खरंच कमी किमतीत वस्तू मिळतात का? Discount चं गणित घ्या समजून

Online shopping सेलमध्ये खरंच कमी किमतीत वस्तू मिळतात का? Discount चं गणित घ्या समजून

ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही थोडा अभ्यास केला तर तुम्हालाही मोठी सूट मिळू शकते. मात्र, यासाठी नेमकं काय करावं लागेल? सेल्समध्ये खरच कमी किमतीत वस्तू मिळतात का? आगामी सेल कधी आहे? अशा अनेक प्रश्नांची A टू Z माहिती.

ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही थोडा अभ्यास केला तर तुम्हालाही मोठी सूट मिळू शकते. मात्र, यासाठी नेमकं काय करावं लागेल? सेल्समध्ये खरच कमी किमतीत वस्तू मिळतात का? आगामी सेल कधी आहे? अशा अनेक प्रश्नांची A टू Z माहिती.

ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही थोडा अभ्यास केला तर तुम्हालाही मोठी सूट मिळू शकते. मात्र, यासाठी नेमकं काय करावं लागेल? सेल्समध्ये खरच कमी किमतीत वस्तू मिळतात का? आगामी सेल कधी आहे? अशा अनेक प्रश्नांची A टू Z माहिती.

मुंबई, 16 नोव्हेंबर: भारतात गेल्या काही वर्षात ऑनलाईन शॉपिंगचं (Online shopping) फॅड प्रचंड वाढलं आहे. स्टेपलरच्या पिनपासून टिव्हीच्या डिशपर्यंत.. घरापासून ऑफिसपर्यंत सर्वकाही ऑनलाईन मिळत आहे. अगदी औषधांपासून मेडीकल इक्विपमेंटपर्यंत एका क्लिकवर घरपोच होतंय. सुरुवातीला याबद्दल जास्त माहिती (Awareness) नव्हती. पण मागील काही काळात हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. लोकं आता पारंपरिक (traditional) पद्धतीने शॉपिंग न करता ऑनलाईन शॉपिंग पद्धतीकडे वळत आहेत. थोडा अभ्यास करुन ऑनलाईन शॉपिंग केली तर यात ग्राहकांचा खूप फायदा आहे. आकडेवारी पाहिली तर ऑनलाईन साईट्सवर सेल्सदरम्यान (Sale) सर्वाधिक ग्राहक खरेदी होते. मात्र, ऑफर्सचे मोठ मोठ आकडे तुमची फसवणूक करू शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला खरेदीच्या A टू Z टिप्स देणार आहोत, जेणेकरुन तुम्हाला अशा सेल्समध्ये कमी किमतीत वस्तू खरेदी करता येईल.

अनेकजण अजूनही ऑनलाईन शॉपिंग कशी आणि कधी करावी याबद्दल अनभिज्ञ आहेत. किंवा तुम्ही अद्याप एकदाही ऑनलाईन शॉपिंग केली नसेल. तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

कोणत्या ऑनलाईन साईट्सवरुन खरेदी करणार?

सध्याच्या काळात चिक्कार ऑनलाईन साईट्स आहेत. त्यामुळे सर्वात आधी साईट्सची विश्वासार्हता तपासून घ्या.

Amazon.in, Flipkart.com, Myntra.com अशा अनेक साईट्स उपलब्ध आहेत. तुम्हाला कोणती वस्तू घ्यायची आहे, त्यानुसार तुम्ही साईट निवडू शकता.

Online Site वर लॉगइन करण्याअगोदर साईट तीच आहे का? हे तपासून घ्या. कारण, अनेक Fraud Sites च्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत.

यासाठी Mobile Application फायदेशीर ठरतात.

Shoping करण्यापूर्वी आपल्याला काय घ्यायचंय? ते ठरवा

बऱ्याचदा बाजारातून अनावश्यक गोष्टी घरी घेऊन आल्याचा तुमचा अनुभव असेल. Online Shoping करतानाही असाच प्रकार होत असल्याचे अनुभव आहेत.

ज्याप्रमाणे बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या Offers दिल्या जातात. त्याचप्रमाणे ऑनलाईन साईट्सवरही अशाच प्रकारे ऑफर्स आणि आकड्यांचा खेळ पहायला मिळतो.

त्यामुळे लॉगईन करण्याअगोदर आपल्याला कोणती वस्तू घ्यायची आहे, ते ठरवा. जेणेकरुन आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.

खरेदीपूर्वी थोडं सर्च करा

कोणतीही खरेदी करण्यापूर्वी थोडा अभ्यास केल्याचा नेहमीच फायदा होतो. यामुळे आपल्या बजेटमध्ये चांगली वस्तू मिळू शकते.

आपल्याला हवी असलेली वस्तूची किंमत इतरही साईटवर तपासून पहा.

वस्तू कोणत्या कंपनीची आहे? त्या कंपनीचं रेटींग आणि इतर कंपन्यांचं रेटींग, ग्राहकांचा फिडबॅक या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन सहज मिळतील.

वस्तूचं रेटींग पहाताना शक्यतो ऑनलाईन साईटवर पाहू नका. कारण, अनेकदा अशा रेटींगमध्ये छेडछाड केलेली असू शकते.

तुम्ही गुगुलवर सर्च करून रेटींग संबंधीत माहिती मिळवू शकता.

तुमच्या आसपास किंवा ओळखीच्या व्यक्ती अशी वस्तू वापरत असेल तर त्यांचा सल्ला कधीही फायदेशीर ठरेल.

Sales मध्ये खरच कमी किमतीत वस्तू मिळतात का?

सणासुदीला किंवा एखाद्या महत्वाच्या दिवशी ऑनलाईन शॉपिंग कंपन्या आपला सेल जाहीर करतात. यात Flipkart चा Big billion day, amazon चा Great indian festival आणि इतरही अनेक सेल्सची नावे तुम्ही ऐकली किंवा पाहिली असतील.

सेल्समध्ये कमी किमतीत वस्तू मिळतात हे खरं असलं तरी सर्वच वस्तूंवर सूट मिळत नाही.

सध्याच्या मार्केटचा विचार केला तर सर्वाधिक सूट ही Electronic वस्तूंवर मिळत आहे.

मार्केटमध्ये नवीन आलेल्या कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंची किंमत कमी करतात.

पण, अनेकदा ऑनलाईन कंपन्या वस्तूची मूळ किंमत वाढवून मग त्यावर घसघशीत सूट दाखवून ग्राहकांना आकर्षित करताना दिसतात.

अशावेळी तुम्ही रिसर्च केला नसेल तर तुमचा खिसा कापला जाण्याची शक्यता आहे.

Sales मध्ये कमी किमतीत वस्तू कशा खरेदी करायच्या?

ऑनलाईन शॉपिंग करताना थोडं डोकं वापरलं तर मोठा फायदा होतो. यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत.

कोणताही मोठा सेल येण्यापूर्वी जी वस्तू घ्यायची आहे, तिच्या किमतीवर किमान महिन्यापूर्वीपासून लक्ष ठेवा.

सेलमध्ये किंमत किती कमी झाली? इतर साईटवर काय परिस्थिती आहे? अनेक कंपन्यांच्या स्वतःच्याही साईट्स असतात, तशा असतील तर तिथंही एकदा किंमत तपासा. जेणेकरुन जी डिल तुमच्यासाठी चांगली आहे, ती निवडता येईल.

सेलमध्ये अनेक बँकाही चांगल्या ऑफर्स देतात, त्याचाही तुम्हाला फायदा उचलता येईल.

सेलमध्ये वस्तू कमी किमतीत कशा मिळतात?

अनेकांना असं वाटतं की कंपन्या तोटा सहन करुन वस्तू कमी किमतीत विकतात. पण, प्रत्यक्षात कंपन्या असं काहीही करत नाही.

पण, मग आपल्याला वस्तू कमी किमतीत कशा मिळतात? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. यासाठी ऑनलाईन शॉपिंग कंपन्या सेल्सच्या अगोदर कोणत्याही मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी करते. हा माल साठवण्यासाठी त्यांनी मोठमोठी गोडाऊन्स ठिकठिकाणी बांधली आहेत.

बल्कमध्ये वस्तू खरेदी करत असल्याने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून काही प्रमाणात सूट दिली जाते. हिच सूट अशा कंपन्या सेल्समध्ये वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी वापरतात.

First published:

Tags: Online shopping, Sale, Sale offers, Shopping