मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सावधान! परदेशातून सोनं आणताना जाणून घ्या सीमा शुल्क विभागाचे नियम; अन्यथा खावी लागेल तुरुंगाची हवा!

सावधान! परदेशातून सोनं आणताना जाणून घ्या सीमा शुल्क विभागाचे नियम; अन्यथा खावी लागेल तुरुंगाची हवा!

परदेशातून भारतात परत येताना काही वस्तू आणायच्या असतील, तर त्यासाठी सीमा शुल्क विभागाचं नियम माहिती असणं आवश्यक आहे.

परदेशातून भारतात परत येताना काही वस्तू आणायच्या असतील, तर त्यासाठी सीमा शुल्क विभागाचं नियम माहिती असणं आवश्यक आहे.

परदेशातून भारतात परत येताना काही वस्तू आणायच्या असतील, तर त्यासाठी सीमा शुल्क विभागाचं नियम माहिती असणं आवश्यक आहे.

मुंबई, 16 नोव्हेंबर:  भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गेल्या सोमवारी यूएईमधून मुंबईत परतला. त्या वेळी पंड्याची पाच कोटी रुपये किमतीची दोन घड्याळं मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने (Custom Department) जप्त केल्याची चर्चा सुरू आहे. हार्दिक पंड्याने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. टि्वटरवर त्याने या संदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. 'माझी घड्याळं (Hardik Pandya Wrist Watch) जप्त करण्यात आलेली नाहीत. मी स्वत: त्यांच्याकडे कस्टम ड्युटी देण्यासाठी गेलो होतो. या घड्याळांची किंमत 5 कोटी नसून 1.5 कोटी रुपये इतकी आहे,' असं हार्दिक पंड्यानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणामुळे सीमा शुल्क विभागाचे नियम (Rules of Custom Department) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तुम्हालाही परदेशातून भारतात परत येताना काही वस्तू (How much custom duty have to pay on airport) आणायच्या असतील, तर त्यासाठी सीमा शुल्क विभागाचं नियम माहिती असणं आवश्यक आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

कस्टम्स ड्युटी अर्थात सीमा शुल्क (Customs Duty) म्हणजे परदेशातून वस्तू आयात केल्यावर सरकारला द्यावा लागणारा कर. सरकारने ठरवून दिलेल्या कोणत्याही वस्तूंच्या प्रमाणापेक्षा जास्त वस्तू परदेशातून भारतात आणता येत नाहीत. असं केल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते. भारत सरकारच्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीने एक वर्षभरापेक्षा अधिक काळ परदेशात वास्तव्य केलं असेल, तर भारतात परत येताना ती व्यक्ती जास्तीत जास्त 40 ग्रॅम सोनं (how much Gold allowed to bring from other country) आणू शकते. हे सोनं दागिन्यांच्या स्वरूपात असायला हवं, असा नियम आहे. यात विशेष म्हणजे महिलांसाठी 40 ग्रॅम सोन्याचं प्रमाण निश्चित करण्यात आलं आहे. हे प्रमाण पुरुषांसाठी केवळ 20 ग्रॅम आहे. तुम्ही काही दिवसांसाठीच परदेशात वास्तव्य केलं असेल, तर अशा परिस्थितीत भारतात परत येताना सोनं न आणलेलंच बरे.

Gold Price: लग्नसराईत वाढले सोन्याचे भाव, आज 50,000 रुपयांच्या जवळपास गोल्ड रेट

नागरिकांनी परदेशातून आणलेल्या वस्तूंवर भारत सरकार सीमा शुल्क (Customs Duty) वसूल करते. सीमा शुल्क निश्चित करण्यासाठी अनेक नियम आहेत. विविध देश, विविध वस्तू आणि परदेशात राहण्याचा कालावधी यासारख्या अनेक घटकांनुसार कस्टम ड्युटी ठरवली जाते. अनेक जण परदेशातून महागडी दारू किंवा सिगारेट विकत घेऊन भारतात आणतात. त्यामुळे सरकारने या गोष्टींना मर्यादा घातली आहे. सीमा शुल्क विभागाच्या नियमांनुसार, परदेशातून येणारा प्रवासी जास्तीत जास्त 2 लिटर दारू किंवा बीअरसोबत आणू शकतो. तसंच 100 सिगारेट, 25 सिगार किंवा 125 ग्रॅमपेक्षा जास्त तंबाखू सोबत आणू शकत नाही.

भारत सरकारच्या नियमांनुसार परदेशातून येणाऱ्या व्यक्तींना आपण आणलेल्या मालाची अचूक माहिती सीमा शुल्क (Customs Duty) विभागाला द्यावी लागते. तुम्ही परदेशातून कोणताही माल केवळ निर्धारित प्रमाणात खरेदी करू शकता आणि आपल्या देशात आणू शकता. यासोबतच त्या सर्व वस्तूंची आवश्यक कागदपत्रं तुमच्याकडे असायला हवीत. असं न केल्यास प्रवासी कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतो. तसंच भरभक्कम दंडही होऊ शकतो. नियमांचं उल्लंघन केल्यास तुरुंगाची हवाही खावी लागू शकते.

First published:

Tags: Gold