• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: आज पेट्रोल-डिझेल दरवाढीला लगाम लागला आहे का? काय आहे आजचा भाव

Petrol-Diesel Price Today: आज पेट्रोल-डिझेल दरवाढीला लगाम लागला आहे का? काय आहे आजचा भाव

पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today) गेल्या काही दिवसांपासून सामान्यांना दिलासा मिळत आहे. अनेक शहरात गेले काही दिवस स्थिर आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today) गेल्या काही दिवसांपासून सामान्यांना दिलासा मिळत आहे. अनेक शहरात गेले काही दिवस स्थिर आहेत. अर्थात जरी किंमती वाढत नसल्या तरी त्यात कपातही झालेली नाही. त्यामुळे आजही इंधनाचे दर (Fuel Rates Today) अनेकांच्या आवाक्याबाहेरच आहेत. IOCL ने बुधवारी देखील नवे दर जारी केले आहेत, आजही किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. याआधी या आठवड्यात रविवार, सोमवार आणि मंगळारी देखील इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. हे वाचा-लवकरच येणार 1,2,5,10 आणि 20 रुपयांची नवी नाणी, पाहा कसे असणार नवीन Coin केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे. आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Rate Today) >> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर हे वाचा-Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील शेअरमधून गुंतवणूकदार मालामाल >> नोएडा पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 87.01 रुपये प्रति लीटर >> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर >> पोर्ट ब्लेयर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते हे वाचा-TATA Motors चा बँक ऑफ इंडियासोबत वाहन फायनान्स करार, ग्राहकांना मिळणार सुविधा अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: