नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची (Demonetisation) घोषणा केली होती. त्या दिवशी मध्यरात्रीपासून चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या. 8 नोव्हेंबर 2021 रोजी नोटबंदी निर्णयाला 5 वर्ष पूर्ण झाली. यादरम्यान एक विशेष गोष्ट घडली आहे. अर्थ मंत्रालय लवकरच 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी (Coins) चलनात आणत आहे. ही नाणी आधिसूचित (Notify) करण्यात आली आहेत. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी अधिसूचित केली असून, त्याला 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये नियम 2021 असं संबोधण्यात येईल. ज्या दिवशी ही अधिसूचना गॅझेटमध्ये प्रकाशित होईल, त्या दिवसापासून हा नवा नियम अस्तित्वात येणार आहे.
या नाण्यांच्या डिझाईनविषयीची माहिती अहवालात देण्यात आली आहे. त्यानुसार 20 रुपयाच्या नाण्याच्या दर्शनी भागावर अशोक स्तंभावरील तीन सिंहांची राजमुद्रा असेल तसेच `सत्य मेव जयते` असं लिहिलेलं असेल. हिंदीत भारत आणि इंग्रजी भाषेत इंडिया असं लिहिलेलं असेल. मागील बाजूस `आजादी का अमृत महोत्सव` चा अधिकृत लोगो (Logo) असेल. या लोगोखाली 20 रुपये लिहिलेलं असेल. इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` असं लिहिलेलं असेल. ज्यावर्षी हे नाणं तयार होईल, त्या वर्षाचा उल्लेख त्यावर असेल.
10 रुपयाच्या नाण्याच्या मागील बाजूस `आजादी का अमृत महोत्सव` चा अधिकृत लोगो असेल. या लोगोखाली 10 रुपये लिहिलेलं असेल. इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` असं लिहिलेलं असेल. ज्यावर्षी हे नाणं तयार होईल, त्या वर्षाचा उल्लेख त्यावर असेल. पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल. तसेच `सत्यमेव जयते` असं लिहिलेलं असेल. हिदींत भारत आणि इंग्रजी भाषेत इंडिया असं लिहिलेलं असेल.
1 रुपयाच्या नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल आणि `सत्यमेव जयते` असं लिहिलेलं असेल. हिंदी भाषेत भारत तर इंग्रजी भाषेत इंडिया असं लिहिलेलं असेल. मागील बाजूला `आजादी का अमृत महोत्सव` असा अधिकृत लोगो असेल. लोगोखाली 1 रुपया असं लिहिलेलं असेल. इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` लिहिलेलं असेल. ज्या वर्षी या नाण्याची निर्मिती केली जाईल, त्या वर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल.
2 रुपयाच्या नाण्याच्या मागील बाजूला `आजादी का अमृत महोत्सव` हा अधिकृत लोगो असेल. लोगो खाली 2 रुपये असं लिहिलेलं असेल. तसेच इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` लिहिलेलं असेल. ज्या वर्षी या नाण्याची निर्मिती केली जाईल त्यावर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल. पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल. तसेच सत्य मेव जयते लिहिलेलं असेल. हिंदी भाषेत भारत तर इंग्रजीत इंडिया लिहिलेलं असेल.
5 रुपयाच्या नाण्याच्या मागील बाजूला `आजादी का अमृत महोत्सव` हा अधिकृत लोगो असले. लोगो खाली 5 रुपये लिहिलेलं असेल. तसेच इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` लिहिलेलं असेल. ज्या वर्षी नाण्याची निर्मिती होईल, त्या वर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल. नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल. तसेच `सत्यमेव जयते` लिहिलेलं असेल. हिंदीत भारत तर इंग्रजी इंडिया लिहिलेलं असेल.
1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी टाकसाळीमध्ये तयार करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या परवानगीनंतर टाकसाळीद्वारे ही नाणी जारी करण्यात येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.