मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Price Today: सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; अद्यापही अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार

Petrol Price Today: सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; अद्यापही अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार

Petrol Price Today: सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जारी करतात. आज शुक्रवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही आहेत.

Petrol Price Today: सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जारी करतात. आज शुक्रवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही आहेत.

Petrol Price Today: सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जारी करतात. आज शुक्रवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: सरकारी तेल कंपन्यांनी आज शुक्रवारी 27 ऑगस्ट रोजी देखील इंधनाच्या किंमतीत (Petrol and Diesel Price Today) कोणताही बदल केलेला नाही. आज सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. या आठवड्यात मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करत सामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. मंगळवारी पेट्रोलचे दर 15 पैशांनी तर डिझेलही 15 पैशांनी स्वस्त झालं होतं. त्याआधी रविवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या होत्या, मात्र सोमवारी दरात कोणताही बदल झाला नव्हता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price in Mumbai) 107.52 रुपये आणि डिझेलचे दर (Diesel Price in Mumbai) 96.48 रुपये प्रति लीटर आहेत. महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे भाव >> दिल्ली पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 88.92 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.52 रुपये आणि डिझेल 96.48 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर हे वाचा-केवळ 50 रुपये दररोज वाचवून व्हाल करोडपती, जाणून घ्या काय आहे ही सोपी प्रोसेस >> कोलकाता पेट्रोल 101.82 रुपये आणि डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.79 रुपये आणि डिझेल 89.49 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 98.06 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.91 रुपये आणि डिझेल 97.72 रुपये प्रति लीटर SMS करुन जाणून घ्या इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-PNB मध्ये FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या Fixed Deposit नवे व्याजदर तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Petrol price

पुढील बातम्या