मराठी बातम्या /बातम्या /मनी /केवळ 50 रुपये दररोज वाचवून व्हाल करोडपती, जाणून घ्या काय आहे ही सोपी प्रोसेस

केवळ 50 रुपये दररोज वाचवून व्हाल करोडपती, जाणून घ्या काय आहे ही सोपी प्रोसेस

Mutual Fund SIP: दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळेल. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेवढा तुम्हाला याचा अधिक फायदा मिळेल.

Mutual Fund SIP: दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळेल. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेवढा तुम्हाला याचा अधिक फायदा मिळेल.

Mutual Fund SIP: दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळेल. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेवढा तुम्हाला याचा अधिक फायदा मिळेल.

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: सध्याच्या काळात पैशांची बचत करण्याबरोबरच त्यांची योग्य पद्धतीने गुंतवणूक (Saving and Investment) करणं आवश्यक आहे. तुम्ही पैशांची बचत केल्यास एक ठराविक रक्कम तुमच्याकडे जमा होईल, पण तेच पैसे तुम्ही योग्य पद्धतीने गुंतवलात तर बचतीच्या रकमेसह अधिकचा रिटर्न तुम्हाला मिळेल. सध्याच्या काळात या दोन्हींचा समतोल राखणं आवश्यक आहे. खासकरुन नोकरदार वर्गासाठी गुंतवणूक करणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचं उत्पन्न आणि खर्च वगळता बचत आणि गुंतवणूक करणं गरजेचं आहे. योग्य बचत तुम्हाला करोडपती बनण्यास मदत करू शकते. याकरता तुम्ही म्युच्युअल फंडबाबत विचार करू शकता.

तुम्ही म्युच्युअल फंड SIP च्या माध्यमातून करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. याकरता केवळ तुम्हाला दिवसाला 50 रुपयांची बचत करावी लागेल. या बचतीमुळे तुम्ही निवृत्तीपर्यंत करोडपती बनू शकता. म्युच्युअल फंड एसआयपी (Systematic Investment Plan) अंतर्गत तुम्हाला मासिक गुंतवणुकीतून मोठी रक्कम मिळवू शकता. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळेल. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेवढा तुम्हाला याचा अधिक फायदा मिळेल.

हे वाचा-ज्येष्ठ नागरिकांसाठी Fixed Deposit चा पर्याय फायद्याचा, GPay वरही काढता येईल FD

वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक

तुम्ही वयाच्या 25व्या वर्षापासून दररोज 50 रुपयांची बचत केली आणि ते पैसे म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवले तर तुम्हाला निवृत्तीपर्यंत अर्थात वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत मोठी रक्कम मिळेल. तुम्ही करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. अर्थात 35 वर्षांकरता तुम्हाला दररोज 50 रुपयांची बचत करायची आहे. ही रक्कम दरमहा 1500 रुपये होईल. योग्य म्युच्युअल फंड निवडून तुम्हाला सरासरी 12-15 टक्क्यांचा रिटर्न मिळेल. तुम्ही 35 वर्षात साधारण 6.3 लाखांची दीर्घकालीन गुंतवणूक केली आणि 12.5 टक्क्यांचा रिटर्न तुम्हाला मिळाला तर हे मुल्य 1.1 कोटी रुपये होईल. दरम्यान याकरता तुम्ही योग्य सल्ल्याने म्युच्युअल फंड निवडणे गरजेचे आहे.

हे वाचा-Post Office च्या या पॉलिसीमध्ये दरमहा 1300 रुपये गुंतवून मिळवा 13 लाख

वयाच्या 30व्या वर्षापासून गुंतवणूक

तुम्ही वयाच्या 30व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर गुंतवणुकीचे 5 वर्ष कमी होतील. त्यामुळे ही उशिरा सुरू केलेली गुंतवणूक तुम्हाला तोट्याची ठरू शकते. तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत करून म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा साधारण 1500 रुपये गुंतवले, तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत तुमची गुंतवणूक जवळपास 5.4 लाख रुपयांची होई. याची एकूण व्हॅल्यू 59.2 लाख रुपये होईल. एकूण 5 वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी कमी झाल्यामुळे तुमचं जवळपास 40 लाखांचं नुकसान होईल.

First published:
top videos

    Tags: Investment, Savings and investments