नवी दिल्ली, 29 जानेवारी: संसदेत केंद्रीय बजेट (Budget 2021) सादर होण्याआधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. पुढील आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2021) सादर केला जातो, तर आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) सध्या सुरू असणाऱ्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असतो. आज 29 जानेवारी रोजी इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला जाणार आहे. हा सर्व्हे सादर केल्यानंतरच अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होईल. आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये मुख्य भूमिका मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम (Krishnamurthy Subramanian) यांची आहे.
आर्थिक सर्वेक्षणात असतो आर्थिक विकासांचा लेखाजोखा
1 फेब्रुवारी 2021 रोजी बजेट सादर केले जाणार आहे. आज जे आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे त्यामध्ये चालू आर्थिक वर्षातील घडामोडींबाबत भाष्य केले जाईल. या संपूर्ण वर्षभरात कोणती आर्थिक विकासकामं केली गेली याचा आढावा यावेळी घेतला जाईल.
(हे वाचा-फेब्रुवारीमध्ये या दिवशी राहणार बँका बंद, कामाचा खोळंबा टाळण्यासाठी तपासा यादी)
आर्थिक सर्वेक्षणाचा अर्थसंकल्पाशी काय संबंध?
इकॉनॉमिक सर्व्हे हे एक महत्त्वाचे इकॉनॉमिक रिपोर्ट कार्ड आहे. याचे काम अर्थव्यस्थेचे विविध पैलू तपासून स्टॅटिस्टिक डेटा सादर करणे हे आहे. नियमानुसार सरकारवर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्याची सक्ती नसते, हा एक प्रक्रियेचा भाग आहे. याशिवाय सर्व्हेमध्ये काही सुधारणांची शिफारस करण्यात आल्यास सरकार त्या देखील मान्य करण्यास बांधील नाही. या सर्वेक्षणात देशाच्या अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन आणि आव्हाने यावर चर्चा केली आहे. यामध्ये सुधारणांची शिफारस केली जाते. तर अर्थसंकल्पात कमाई आणि होणारा खर्च याबाबक अंदाज आहे. योजनांसाठी निधीचे वाटप केले जाते.
(हे वाचा-अर्थसंकल्पात 5G वर राहणार फोकस, टेलिकॉम क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता)
आजपासून सुरू होत आहे बजेट सेशन
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात होते आहे. सेशन दरम्यान 1 फेब्रुवारी 2021 रोजी बजेट सादर केलं जाईल. लोकसभा सचिवालयानुसार, दोन भागांमध्ये असणारे हे बजेट सेशन 8 एप्रिल 2021 पर्यंत असणार आहे. 29 जानेवारीपासून बजेट सत्राचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. 29 जानेवारीपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2021, Money