मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LIC ची खास पॉलिसी, दररोज 121 रुपये जमा करून मुलीच्या लग्नासाठी मिळतील 27 लाख

LIC ची खास पॉलिसी, दररोज 121 रुपये जमा करून मुलीच्या लग्नासाठी मिळतील 27 लाख

LIC Policy: तुम्हाला देखील मुलगी आहे आणि  तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करू इच्छित आहात तर LIC ची ही पॉलिसी तुमच्यासाठी बेस्ट  आहे.

LIC Policy: तुम्हाला देखील मुलगी आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करू इच्छित आहात तर LIC ची ही पॉलिसी तुमच्यासाठी बेस्ट आहे.

LIC Policy: तुम्हाला देखील मुलगी आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करू इच्छित आहात तर LIC ची ही पॉलिसी तुमच्यासाठी बेस्ट आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तिच्या जन्मावेळीच गुंतवणूक करण्याला अनेकजण पसंती देतात. आम्ही तुम्हाला LIC ची अशी एक पॉलिसी सांगणार आहोत, जी मुलीच्या लग्नासाठी खास बनवण्यात आली आहे. LIC च्या या पॉलिसीचं नावही साजेसं आहे- LIC कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy). या योजनेमध्ये दररोज 121 रुपयांची बचत अर्थात मासिक 3600 रुपयांचा प्रीमियम भरून तुम्ही ही योजना खरेदी करू शकता. यापेक्षी कमी किंवा यापेक्षा जास्त किंमतीचा प्रीमियमही तुम्ही खरेदी करू शकता.

121 रुपयांच्या हिशोबाने तुम्ही जर या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर 25 वर्षानंतर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील. याशिवाय पॉलिसी खरेदी केल्यानंतर मृत्यू झाल्यास कुटुंबाला या पॉलिसीचा प्रीमयम भरावा लागणार नाही, वार्षिक 1 लाख रुपये मिळतील. याशिवाय 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नॉमिनीला 27 लाख रुपयेही मिळतील.

(हे वाचा-SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक, इथे तपासा यादी)

ही पॉलीसी खरेदी करणाऱ्याचे वय कमीतकमी 30 वर्षे तर मुलीचं वय 1 वर्षं असणं  आवश्यक आहे. ही योजना 25 वर्षाची असली तरी, प्रीमियम 22 वर्षांसाठी द्यावा लागेल. मात्र तुमच्या मुलीच्या वयाच्या  मानाने वेगवेगळ्या पद्धतीने ही पॉलिसी खरेदी करता येते. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीचा कालावधी निश्चित केला जातो.

काय आहेत महत्त्वाचे मुद्दे?

-25 वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते पॉलिसी

-22 वर्षांपर्यंत द्यावा लागेल प्रीमियम

-दररोज  121 रुपये बचत करून महिना 3600 रुपयांचा प्रीमियम भरता येईल

(हे वाचा-Scam 1992च्या हर्षद मेहताने बजेट 2021 बद्दल सांगितलं होतं खरं भविष्य?VIDEO VIRAL)

-वीमाधारकाचा मध्येच मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना पैसे भरावे लागणार नाहीत

-मुलीला पॉलिसीच्या शिल्लक वर्षापर्यंत प्रति वर्षाला मिळतील 1 लाख

-पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर नॉमिनीला मिळतील 27 लाख रुपये

-यापेक्षा  कमी किंवा जास्त प्रीमियमवर पॉलिसी खरेदी करता येईल.

First published:

Tags: Insurance, Money