LPG Gas Cylinder Price: ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

LPG Gas Cylinder Price: ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

14.2 किलोच्या एलपीजी गॅसची किंमत 694 रुपये होती, या वाढीनंतर आता सबसिडी नसणाऱ्या या एलपीजी गॅसची किंमत 719 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी बजेटनंतर (Budget 2021) एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने 4 फेब्रुवारी रोजी एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडेनने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार गॅस सबसिडी नसणाऱ्या एलपीजीची किंमत मुंबई आणि दिल्लीमध्ये 25 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दरम्यान कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 6 रुपयांची घट करण्यात आली आहे.

काय आहेत नवे दर?

14.2 किलोच्या एलपीजी गॅसची किंमत 694 रुपये होती, या वाढीनंतर आता सबसिडी नसणाऱ्या या एलपीजी गॅसची किंमत 719 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती बदलतात. पण या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी बजेट असल्याने त्या दिवशी किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. जानेवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. मात्र फेब्रुवारीमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने किंमती वाढल्याने ग्राहकांसाठी हा झटका मानला जात आहे. जानेवारीमध्ये कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या होत्या.

(हे वाचा-अचानक गॅस संपल्यास नो टेन्शन; फक्त 30 मिनिटांत तुमच्या घरात येणार LPG cylinder )

तुमच्या शहरात 14.2 किलोग्रॅम सिलेंडरचे काय आहेत दर?

नवी दिल्ली- 719 रुपये

मुंबई- 719 रुपये

चेन्नई- 735 रुपये

कोलकाता- 745.50 रुपये

(हे वाचा-LIC ची खास पॉलिसी, दररोज 121 रुपये जमा करून मुलीच्या लग्नासाठी मिळतील 27 लाख)

काय आहेत कमर्शिअल गॅसच्या किंमती?

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार 19 किलोच्या कमर्शअल गॅसच्या किंमती आज 4 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील प्रमाणे आहेत

नवी दिल्ली- 1533 रुपये

मुंबई- 1482.50 रुपये

चेन्नई- 1649 रुपये

कोलकाता- 1598.50  रुपये

First published: February 4, 2021, 10:21 AM IST

ताज्या बातम्या