मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गाजावाजा झालेल्या Paytm share पहिल्याच दिवशी का घसरला? गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

गाजावाजा झालेल्या Paytm share पहिल्याच दिवशी का घसरला? गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

Paytm IPO: देशातला सर्वांत मोठा आयपीओ (Largest IPO in India) अशी चर्चा झालेल्या Paytm चा शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी जोरदार घसरला. गुंतवणुकदारांचे  40 हजार कोटी रुपये बुडले आहेत. आता पुढे काय?

Paytm IPO: देशातला सर्वांत मोठा आयपीओ (Largest IPO in India) अशी चर्चा झालेल्या Paytm चा शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी जोरदार घसरला. गुंतवणुकदारांचे 40 हजार कोटी रुपये बुडले आहेत. आता पुढे काय?

Paytm IPO: देशातला सर्वांत मोठा आयपीओ (Largest IPO in India) अशी चर्चा झालेल्या Paytm चा शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी जोरदार घसरला. गुंतवणुकदारांचे 40 हजार कोटी रुपये बुडले आहेत. आता पुढे काय?

मुंबई, 18 नोव्हेंबर: देशातला सर्वांत मोठा आयपीओ (Largest IPO in India) अशी चर्चा झालेल्या पेटीएमबाबत (Paytm IPO) झाली होती. पेटीएमची मातृसंस्था असलेल्या One 97 Communications या कंपनीची आज, 18 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात नोंदणी (Listing in Stock Market) झाली; मात्र त्यानंतर कंपनीच्या शेअरचं मूल्य (Paytm share price) अपेक्षेपेक्षा तब्बल 27 टक्क्यांपर्यंत कोसळलं आहे.

पेटीएम कंपनीने 18,300 कोटी रुपयांचे शेअर्स आयपीओद्वारे (IPO) विक्रीसाठी खुले केले होते. पेटीएमने या आयपीओचा किंमतपट्टा 2080 ते 2150 रुपये असा ठेवला होता. इश्यूच्या शेवटच्या दिवशी या आयपीओला 1.89 पट सबस्क्रिप्शन मिळालं. 4.83 कोटी शेअर्सना 9.14 कोटी शेअर्सची बोली लागली होती. आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनला बायर्सचा (QIB) कोटा 2.79 पट सबस्क्राइब झाला होता. तसंच किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 1.66 पट भरला होता, तर नॉन इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (NIB) कोटा केवळ 24 टक्केच भरला होता. ही देशाच्या इतिहासातली सर्वांत मोठी शेअरविक्री होती. 8300 कोटी रुपये नव्या इक्विटी शेअर्सद्वारे आणि 10 हजार कोटी रुपये विद्यमान शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर्सच्या शेअरच्या माध्यमातून असा 18300 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता.

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; तज्ज्ञांच्या मते उद्याची स्थिती कशी असेल?

त्यामुळे शेअर बाजारात या शेअरची नोंदणी किती रुपयांना होते आणि त्याचा व्यापार कसा होतो, याकडे सर्वांचंच लक्ष होतं; मात्र पहिल्या टप्प्यात तरी या शेअरने निराशा केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात धाकधूक सुरू झाली आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हा शेअर 1955 रुपयांना शेअर बाजारात लिस्ट झाला. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.40 वाजण्याच्या दरम्यान हा शेअर 1576 रुपयांच्या पातळीवर जवळपास 27 टक्के नीचांकी पातळीवर होता. त्या वेळी त्या शेअरची मार्केट कॅप (Market Cap) 10.02 लाख कोटी रुपये एवढी आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचं जवळपास 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं लक्ष असलेलं 'ग्रे मार्केट' म्हणजे काय?

शेअर बाजार तज्ज्ञांच्या मतानुसार 1500 रुपयांच्या किमतीच्या खाली या कंपनीचा शेअर आकर्षक आहे. या पातळीपेक्षा तो खाली आला तर खरेदी करणं ही चांगली रणनीती ठरू शकते. मॅक्युरी (Macquarie) या नामवंत ब्रोकरेज हाउसने या कंपनीच्या शेअरचं लक्ष्य 1200 रुपये प्रति शेअर असं निर्धारित केलं आहे. मॅक्युरीच्या रिपोर्टनंतर या शेअर्सची पटापट विक्री होऊ लागली आहे.

गुरुवारी सकाळी (18 नोव्हेंबर) 1955 रुपयांना पेटीएमच्या शेअरचं लिस्टिंग झालं. त्यानंतर काही मिनिटांतच शेअर घसरून 1586 रुपयांवर आला. तरीही काही जणांनी धैर्य दाखवून शेअर्सची खरेदी केली; मात्र नंतरच्या ट्रेडिंगमध्ये या शेअर्सची पुन्हा एकदा विक्री होऊ लागली. या शेअरला लोअर सर्किट लिमिट 1560 रुपये ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे शेअरचा भाव घसरून 1560 रुपयांपर्यंत आला, तर ट्रेडिंग बंद केलं जाईल.

Paytm IPO : सर्वात मोठ्या आयपीओने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली

पेटीएम कंपनीने असं म्हटलं आहे, की आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या रकमेपैकी 4300 कोटी रुपयांचा वापर पेमेंट इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी केला जाणार आहे. त्यातून कंपनी आपले व्यापारी आणि ग्राहकांना तंत्रज्ञान आणि आर्थिक सेवांच्या बाबतीत अधिक सुविधा देऊ शकेल. 2000 कोटी रुपयांचा उपयोग कंपनी नवे व्यावसायिक पुढाकार आणि धोरणात्मक भागीदारीसाठी करील. उर्वरित रकमेचा वापर जनरल कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी केला जाणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

दरम्यान, पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाल्यामुळे पेटीएमची मार्केट कॅप झोमॅटोपेक्षाही कमी झाली आहे. झोमॅटोची मार्केट कॅप आज 1.23 लाख कोटी रुपये आहे, तर पेटीएमची मार्केट कॅप 1.08 लाख कोटी रुपये आहे. पेटीएमची मार्केट कॅप 1.48 लाख कोटी रुपये होईल, असा अंदाज लिस्टिंग होण्यापूर्वी वर्तवण्यात आला होता.

पेटीएमच्या शेअरची घसरण का झाली, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. मॅक्युरी या ब्रोकरेज हाउसने आपल्या रिपोर्टमध्ये पेटीएम कंपनीवर काही सवाल उपस्थित केले आहेत. पेटीएमच्या बिझनेस मॉडेलमध्ये फोकस आणि दिशा यांची कमतरता आहे. मॅक्युरीने पेटीएमला कॅश गझलर कंपनी असं म्हटलं असून, नफा मिळवण्याचं मोठं आव्हान कंपनीसमोर असल्याचं म्हटलं आहे. सध्याचे नियम आणि स्पर्धा या गोष्टी कंपनीसाठी चिंताजनक असल्याचंही त्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

पेटीएम पेमेंट बिझनेस मॉडेलचं यूपीआयमुळे सर्वांत जास्त नुकसान होत असल्याचं रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यूपीआय हे तंत्रज्ञान एनसीपीआय या सरकारी कंपनीने विकसित केलं असून, डिसेंबर 2019 पासून यूपीआय हे तंत्रज्ञान भारत सरकारने ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी मोफत उपलब्ध केलं आहे.

Rakesh Jhujhunwala यांच्याकडील 'या' शेअरला ICICI Securities ची पॉझिटिव्ह रेटिंग

मॅक्युरीच्या म्हणण्यानुसार, पेटीएमचं व्हॅल्युएशन खूप महाग आहे. रिझर्व्ह बँक लवकरच फिनटेक कंपन्यांच्या 'बाय नाऊ, पे लॅटर' या योजनेवर नियंत्रण आणू शकते. पेटीएमने आपल्या स्थापनेपासून आतापर्यंत 19 हजार कोटी रुपयांचा निधी उभारला असून, या क्षणी ही सगळी रक्कम तोट्यात आहे, असं मॅक्युरीच्या रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मॅक्युरीच्या या रिपोर्टनंतरच या शेअर्सची पटापट विक्री होऊ लागली.

First published:

Tags: Paytm, Share market