• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Paytm IPO : सर्वात मोठ्या आयपीओने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली? लॉट लागल्याचा आनंद नव्हे टेन्शन

Paytm IPO : सर्वात मोठ्या आयपीओने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली? लॉट लागल्याचा आनंद नव्हे टेन्शन

ग्रे मार्केटमध्ये पेटीएमचा (Paytm IPO GMP) शेअर 2,150 रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा 2180 म्हणजेच 30 रुपये किंवा 1.4 टक्क्यांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. या किंमतीत सातत्याने घट होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर : IPO मध्ये गुंतवणूक करुन गुंतवणूकदारांना कमी वेळेत जास्त कमाईची संधी असते. यावर्षी अनेक IPO नी गुंतवणूकदारांना मालामाल केले. काही IPO मुळे तर गुंतवणूकदारांचे पैसे कमी वेळेत दुप्पट झाले. अशात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला Paytm ची पॅरंट कंपनी One 97 Communications चा आयपीओ उद्या म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी शेअर बाजाराच लिस्ट (Paytm IPO Listing) होण्याच्या तयारीत आहे. मात्र जेवढ्या मोठ्या प्रमाणात Paytm च्या आयपीओची चर्चा झाली, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही.  लिस्टिंग आधी ग्रे मार्केट प्रीमियममुळे (Paytm IPO GMP) गुंतवणूकदार निराश झाले असावे. देशातील आजवरचा सर्वात मोठ्या 18,300 कोटी रुपयांच्या Paytm IPO ला 1.89 पट बोली लागली होती. 8 नोव्हेंबर रोजी IPO उघडला आणि 10 नोव्हेंबर रोजी बंद झाला. याला Qualified Institutional Buyer श्रेणीतील 2.79 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या (Retail Investors) श्रेणीत 1.66 पट बोली मिळाली. गुंतवणूकदार पेटीएमच्या (Paytm Investors)आयपीओची आतुरतेने वाट पाहत होते पण त्याला अपेक्षेप्रमाणे सबस्क्रिप्शन मिळाले नाही. पेटीएमच्या आयपीओमध्ये 8,300 कोटी रुपयांचे शेअर्स आणि 10,000 कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेल (OFS) चे ताजे इश्यू होते. Non Institutional Investors (NII) श्रेणीमध्ये पेटीएम आयपीओला केवळ 24 टक्के शेअर्ससाठी बोली लागली. वयाच्या कोणत्या वर्षी LIC ची पॉलिसी घेणे फायदेशीर? मुलांचं भविष्य असं करा सुरक्षित पेटीएमची ग्रे मार्केटमधील स्थिती काय? मात्र कमी सबस्क्रिप्शननंतर आता गुंतवणूकदारांच्या आशा पेटीएम आयपीओच्या लिस्टिंगवर टिकून आहेत. मात्र ग्रे मार्केटमधून आलेल्या बातमीमुळे त्यांची आणखीच निराशा झाली. ग्रे मार्केटमध्‍ये कंपनीच्‍या अनलिस्टेड शेअर्ससाठी प्रिमियम केवळ 30 रुपये आहे. ग्रे मार्केटमध्ये पेटीएमचा शेअर 2,150 रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा 2180 म्हणजेच 30 रुपये किंवा 1.4 टक्क्यांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. या किंमतीत सातत्याने घट होत आहे. 7 नोव्हेंबर रोजी हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 2,300 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत होता. हे त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 150 रुपये किंवा 7 टक्के जास्त आहे. IPO च्या पहिल्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरला तो 80 रुपयांपर्यंत खाली आला होता, तर इश्यूच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 10 नोव्हेंबरला हा प्रीमियम 40 रुपयांपर्यंत घसरला होता. शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर पेटीएमचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सातत्याने घसरत असल्याचे पाहिले आहे आणि तेच आता सुमारे 30 रुपये आहे. माझ्या मते, GMP ची घसरण झाली आहे कारण IPO ला इतका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या काही महिन्यांपासून या आयपीओकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. यामुळे सेकंडरी मार्केटमध्ये पुरेसा पुरवठा उपलब्ध होईल तोही सवलतीच्या दरात उपलब्ध होईल. आणि त्यामुळे GMP मध्ये घसरण झाल्याचे संकेत मिळत आहेत, अस CapitalVia Global Research चे रिसर्च हेड गौरव गर्ग यांनी सांगितलं.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: