• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; तज्ज्ञांच्या मते उद्याची स्थिती कशी असेल?

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; तज्ज्ञांच्या मते उद्याची स्थिती कशी असेल?

सेन्सेक्स 314 अंकांनी घसरून 60,008 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 101 अंकांनी घसरून 17,899 वर बंद झाला. निफ्टी बँक 266 अंकांनी घसरून 38,041 वर बंद झाला.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर : शेअर बाजारात आज तिसऱ्या दिवशीही घसरण दिसून आली. आज पुन्हा SENSEX-NIFTY अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरून बंद झाला. निफ्टी बँक (Nifty Bank) आणि मिडकॅप निर्देशांकातही (Midcap Index) हीच स्थिती होती. सेन्सेक्स 314 अंकांनी घसरून 60,008 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 101 अंकांनी घसरून 17,899 वर बंद झाला. निफ्टी बँक 266 अंकांनी घसरून 38,041 वर बंद झाला. मिडकॅप 214 अंकांनी घसरून 31,729 वर बंद झाला. आज सेन्सेक्समधील 30 पैकी 19 शेअर घसरले. तर निफ्टीच्या 50 पैकी 35 शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 शेअर्समध्ये विक्री दिसली. दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी मजबूत होऊन 74.27 वर बंद झाला. Geojit Financial Services चे विनोद नायर यांनी सांगितलं की, यूएसमधील रिटेस विक्रीचे आकडे जागतिक बाजारपेठेत उत्साह निर्माण करू शकले नाहीत. आज देशांतर्गत निर्देशांक देखील नकारात्मक ट्रेंडसह ट्रेड करताना दिसून आले आणि शेवटी लाल चिन्हावर बंद झाले. इंग्लंडमधील वाढत्या महागाईने गुंतवणूकदारांचा मूड खराब झाला आहे. जगभरात महागाईची चिंता वाढत असल्याचे दिसते. अमेरिकेतील किरकोळ विक्री ऑक्टोबरमध्ये 1.7 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जी अपेक्षेपेक्षा जास्त आहे. परंतु कोविड-19 च्या नवीन केसेसमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंदीची भीती निर्माण झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेवर नजर टाकल्यास सेमीकंडक्टरवरील सकारात्मक बातम्यांमुळे आज ऑटो क्षेत्र फोकसमध्ये होतं. शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर उद्याचा बाजाराचा कल कसा असेल? LKP सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे यांनी सांगितलं की, म्हणतात की आज निफ्टी 17900 च्या रायजिंग ट्रेंड लाईनचा सपोर्ट तोडताना दिसला जो निफ्टी 17,800-17,700 च्या दिशेने गेला तर त्यात आणखी कमजोरी येऊ शकते. निफ्टीसाठी हा पुढील महत्त्वाचा सपोर्ट आहे. निफ्टीसाठी 17950-18000 वर रेझिस्टन्स दिसत आहे. निफ्टीला तेजीत येण्यासाठी 18000 च्या वर राहावे लागेल. वयाच्या कोणत्या वर्षी LIC ची पॉलिसी घेणे फायदेशीर? मुलांचं भविष्य असं करा सुरक्षित Religare Broking चे अजित मिश्रा यांनी सांगितलं की, कमकुवत जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम होत आहे. देशांतर्गत बाजारातही गुंतवणूकदारांना खूश करणारे कोणतेही ट्रिगर नाही. सध्या निफ्टीमध्ये आणखी घसरण होण्याची चिन्हे आहेत पण ही घसरण हळूहळू येईल. निफ्टीला पुढील सपोर्ट 17,800-17,700 च्या आसपास आहे. यात काही रीबाउंड असल्यास 18000 पातळी सपोर्ट म्हणून कार्य करेल. हे लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी बाजारात पोजिशन तया करावी.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: