मराठी बातम्या /बातम्या /मनी /

IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं लक्ष असलेलं 'ग्रे मार्केट' असतं काय?

IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं लक्ष असलेलं 'ग्रे मार्केट' असतं काय?

IPO संबंधील Grey market मध्ये ट्रेडर इनफॉर्मल पद्धतीने कंपनी शेअर्समध्ये ट्रेडींग करतात. कंपनीचे शेअर IPO च्या माध्यमातून लाँच होण्याआधीच येथे ट्रेडिंग होते. ग्रे मार्केट हे एक अनऑफिशियल मार्केट असते.

IPO संबंधील Grey market मध्ये ट्रेडर इनफॉर्मल पद्धतीने कंपनी शेअर्समध्ये ट्रेडींग करतात. कंपनीचे शेअर IPO च्या माध्यमातून लाँच होण्याआधीच येथे ट्रेडिंग होते. ग्रे मार्केट हे एक अनऑफिशियल मार्केट असते.

IPO संबंधील Grey market मध्ये ट्रेडर इनफॉर्मल पद्धतीने कंपनी शेअर्समध्ये ट्रेडींग करतात. कंपनीचे शेअर IPO च्या माध्यमातून लाँच होण्याआधीच येथे ट्रेडिंग होते. ग्रे मार्केट हे एक अनऑफिशियल मार्केट असते.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 16 नोव्हेंबर : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात आता अनेक कंपन्या आपले IPO आणत आहेत. त्यांना चांगले सबस्क्रिप्शनही मिळत आहे. यावर्षी आतापर्यंत 50 हून अधिक आयपीओचं यशस्वीरित्या लिस्टिंग झालं आहे. अनेकजण IPO मध्ये आपली गुंतवणूक करतात, मात्र अनेकजण जे नवखे आहेत त्यांना काही शंका असतात. आयपीओ आल्यापासून त्याची लिस्टिंग होईपर्यंत अनेक गोष्टी घडत असतात. त्यात GMP हा शब्द काय कानावर पडत असतो. तर GMP म्हणजे (Grey Market Premium). आता GMP म्हणजे नेमकं का आणि GMP वर गुंतवणूकदारांचं एवढं लक्ष का असतं याबाबत माहिती घेऊया. त्याआधी आयपीओ म्हणजे काय हे समजून घेऊयात.

आयपीओ म्हणजे एखाद्या कंपनीनं पहिल्यांदा लोकांना आपल्या शेअर्सची म्हणजेच समभागांची विक्री करणे. आयपीओपूर्वी, कंपनीचे शेअर्स ठराविक भागधारकांकडेच (Stake Holders) असतात. आयपीओनंतर, सर्वसामान्य लोक आणि इतर संस्थात्मक गुंतवणूकदार कंपनीचे शेअर्स खरेदी करतात. त्यामुळे शेअर्सची संख्या अनेक पटीने वाढते आणि या इनिशियल ऑफरसह, कंपनी स्टॉक एक्सचेंज अर्थात शेअर बाजारात लिस्ट होते. त्यामुळे तिच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री सोपी होते. नवीन व्यवसायात जोखीम घेणाऱ्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना आणि कंपनीच्या मालकांना ऑफर फॉर सेलद्वारे (Offer for Sale) बाहेर पडण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीची त्यांना भरपाई मिळते.

शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर

ग्रे मार्केट म्हणजे काय?

IPO संबंधील Grey market मध्ये ट्रेडर इनफॉर्मल पद्धतीने कंपनी शेअर्समध्ये ट्रेडींग करतात. कंपनीचे शेअर IPO च्या माध्यमातून लाँच होण्याआधीच येथे ट्रेडिंग होते. ग्रे मार्केट हे एक अनऑफिशियल मार्केट असते. यामुळे याठिकाणी कोणतेही नियमावली नसते. ग्रे मार्केटमधील ट्रेडिंगमध्ये SEBI ची कोणतीही जबाबदारी आणि तिथे सेबीची दखली नसते. या ग्रे मार्केटचे संचालन केवळ काही लोकांद्वारे म्युच्युअल ट्रस्टवर होतो.

कोणतीही कंपनी जेव्हा IPO लाँच करते, तेव्हा ती आपल्या शेअरची टेस्टींग ग्रे मार्केटमध्ये करते. असं करण्यामागे बरीच कारणे असू शकतात, जसे IPO वॅल्यूएशनची गणना करणे किंवा IPO च्या मागणीचा एक अंदाज लावणे.

वयाच्या कोणत्या वर्षी LIC ची पॉलिसी घेणे फायदेशीर? मुलांचं भविष्य असं करा सुरक्षित

ग्रे मार्केट प्रीमियरवर IPO लिस्टिंग प्राईजचा अंदाज कसा येतो?

उदाहरणार्थ, जर XYZ नावाच्या कंपनीच्या IPO ची वरची प्राईज बँड 375 रुपये असेल आणि IPO ग्रे मार्केट प्रीमियम 75 रुपये असेल. त्यानंतर या विशिष्ट IPO ची अनधिकृत किंमत 375 + 75 रुपये म्हणजे 450 होते. तुम्ही ग्रे मार्केटमध्ये कधीही खरेदी किंवा विक्री करू शकता आणि तुमच्याकडे आयपीओ सूचीबद्ध होण्यापूर्वी तुमचे खरेदी केलेले किंवा उर्वरित शेअर्सचे वर्गीकरण करण्याचा पर्याय आहे. हा बाजार चालवण्यासाठी काही खास डीलर्स आहेत जे व्यापार्‍यांमध्ये विविध शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्यात मदत करतात. या खरेदी किंवा विक्रीबद्दल अधिकृत काहीही नाही आणि स्पष्टपणे, यात कोणताही कर लागणार नाही.

First published:

Tags: Money, Share market