Home /News /money /

Paytm Payments बँकेला RBI कडून 'शेड्युल्ड बँके'चा दर्जा, पेटीएमच्या शेअरमध्ये उसळी

Paytm Payments बँकेला RBI कडून 'शेड्युल्ड बँके'चा दर्जा, पेटीएमच्या शेअरमध्ये उसळी

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) Paytm Payments Bank Ltd ला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा देण्यात आला आहे. हा निर्णय आरबीआय कायदा 1934 अंतर्गत घेण्यात आला आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर : डिजिटल पेमेंट आणि फायनान्शिय सर्विस कंपनी Paytm च्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) Paytm Payments Bank Ltd ला शेड्यूल बँकेचा (Scheduled Bank) दर्जा देण्यात आला आहे. हा निर्णय आरबीआय कायदा 1934 अंतर्गत घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे, पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी वाढले, जे गेले काही दिवस सतत घसरत होते. पेटीएम पेमेंट्स बँकेने गुरुवारी सांगितले की, 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या दुसऱ्या शेड्यूल सूची'मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. शेड्यूल्ड पेमेंट्स बँक असल्याने, पेटीएम पेमेंट्स बँक आता नवीन व्यवसाय संधी शोधू शकते. Paytm ने एका निवेदनात म्हटले आहे की, बँक मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलिटीमध्ये भागीदारीसर सरकारच्या आणि इतर मोठ्या कॉर्पोरेशन्सद्वारे जारी केलेले रिक्वेस्ट फॉर प्रपोझर्स (RFP), प्रायमरी ऑक्शन्स, फिक्स्ड रेट आणि वेरिएबिल रेट रेपोजमध्ये आता सामील होऊ शकणार आहे. बँक आता सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या आर्थिक समावेशन योजनांमध्ये भागीदार होण्यासाठी देखील पात्र असेल. तुमचे पैसे 'या' अ‍ॅपमध्ये गुंतवा; बँक, पोस्टापेक्षा जास्त 12 टक्के व्याज मिळेल अन् कर्जही घेता येईल नवीन कामात बँकेला मदत मिळेल RBI कायदा, 1934 अन्वये, RBI त्या बँकांचा सेकंड शेड्यूलमध्ये समावेश करते, ज्यातून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या ठेवीदारांचे कोणतेही नुकसान होत नसल्याचे समाधान आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेचे एमडी आणि सीईओ सतीश कुमार गुप्ता म्हणाले, “भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, 1934 च्या सेकंड शेड्यूलमध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेचा समावेश केल्याने आम्हाला नवीन कामे करण्यास मदत मिळेल आणि भारतातील तळागळातील आणि सेवा न मिळालेल्या लोकसंख्येला आर्थिक सेवा पुरवण्यास मदत मिळेल. Radhe Developers शेअरमुळे गुंंतवणूकदार मालामाल! सहा महिन्यात स्टॉकमध्ये 3150 टक्क्यांची वाढ पेटीएम पेमेंट्स बँकेचा विस्तार सुरूच आजपर्यंत, पेटीएम पेमेंट्स बँक 33.3 कोटी पेटीएम वॉलेट्सना सेवा देते आणि ग्राहकांना 87,000 ऑनलाइन मर्चंड्स आणि 21.11 कोटी इन-स्टोअर मर्चंट्सना पेमेंट करण्यास सक्षम करते. पेटीएमने सांगितले की, आतापर्यंत 155 कोटी पेटीएम यूपीआय हँडल तयार करण्यात आले आहेत आणि ते पेटीएम पेमेंट्स बँकेसह पेमेंट करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी वापरले जात आहेत. गेल्या वर्षी, बँक देशातील सर्वात मोठी FASTags जारी करणारी आणि खरेदीदार बनली. अलीकडे, पेटीएम पेमेंट्स बँक एशिया पॅसिफिक (APAC) रिजनमध्ये कार्यरत असलेल्या सर्वात यशस्वी डिजिटल बँकांपैकी एक म्हणून उदयास आली होती. Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 'या' शेअरमध्ये ब्रेकआऊट, गुंतवणूकदारांना खरेदीची संधी शेड्युल बँक म्हणजे काय? बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी आणि इतर बँकांना नियम घालणारी सर्वोच्य संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एखादी व्यापारी बँक, सहकारी बँक किंवा सहकारी पतसंस्था रिझर्व्ह बँकने ठरवलेल्या काही निकषांची पूर्तता करते तेव्हा त्या बँकेला शेड्युल बँक म्हटलं जातं. ज्या बँकेला शेड्युल बँकेचा दर्जा मिळवायचा असतो तिला दोन निकषांची पूर्तता करावी लागते. एक म्हणजे बँकेने रिझर्व्ह बँकेला 5 लाख रुपयांची एक राखीव भांडवल पुरवणे गरजेचे आहे आणि हे भांडवल बँक चालू राहील तोपर्यंत ठेवायला हवे. दुसरं म्हणजे बँकेच्या ठेवीदारांचे हित धोक्यात येईल असे कुठलेही व्यवहार बँक करत नाहीये याची खात्री रिझर्व्ह बँकेला पटली पाहिजे. एखाद्या बँकेला शेड्युल बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर तिची विश्वासाहर्यता वाढते कारण रिझर्व्ह बँकेला तिची खात्री पटलेली असते. दुसरा अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे व्यवहारासाठी शेड्युल बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेऊ शकते. असे कर्ज पायाभूत दरानुसार (Base Rate) मिळते आणि त्यामुळेच कर्जावरील व्याजाचा दर हा सहसा इतर कुठल्याही कर्जापेक्षा कमी असतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Payment, Paytm, Rbi

    पुढील बातम्या