Home /News /money /

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 'या' शेअरमध्ये ब्रेकआऊट, गुंतवणूकदारांना खरेदीची संधी

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 'या' शेअरमध्ये ब्रेकआऊट, गुंतवणूकदारांना खरेदीची संधी

Delta Corp शेअर लाँग टर्मसाठी 380 रुपयांच्या अपसाईडवर जाण्यास तयार दिसत आहे. बाजारातील तज्ज्ञ गुंतवणूकदारांना (Share Market Investors ) सल्ला देत आहेत की ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांनी चांगल्या परताव्यासाठी या स्टॉकमध्ये राहावे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 डिसेंबर : गेमिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर (Gaming and Hospitality Sector) संबंधित स्टॉक डेल्टा कॉर्पने (Delto Corp) क्लोजिंग बेसिस वर 260 रुपयांच्या स्तरावर 7 दिवसांचा कंसोलिडेशन ब्रेकआउट दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता हा शेअर लाँग टर्मसाठी 380 रुपयांच्या अपसाईडवर जाण्यास तयार दिसत आहे. बाजारातील तज्ज्ञ गुंतवणूकदारांना (Share Market Investors ) सल्ला देत आहेत की ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांनी चांगल्या परताव्यासाठी या स्टॉकमध्ये राहावे. चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया म्हणाले की, 7 दिवसांच्या कन्सॉलिडेशननंतर डेल्टा कॉर्पचे शेअर्स 260 रुपयांवर आले आहेत. येत्या ट्रेडिंग सत्रात या काउंटरमध्ये आणखी अपसाईड होण्याची चिन्हे आहेत. पोजिशनल इन्वेस्टर्स हा स्टॉक 265-270 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करू शकतात. नजीकच्या काळात या शेअरमध्ये 285-300 रुपयांची पातळी सहज दिसून येईल. यासाठी 245 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवता येईल. तुमचे पैसे 'या' अ‍ॅपमध्ये गुंतवा; बँक, पोस्टापेक्षा जास्त 12 टक्के व्याज मिळेल अन् कर्जही घेता येईल Proficient Equities चे मनोज दालमिया म्हणाले की, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत डेल्टा कॉर्पचा नफा वार्षिक आधारावर 58.50 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र तरीही FPIs आणि FII ने जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत स्टॉकची विक्री केली आहे. मनोज दालमिया पुढे सांगतात की आक्रमक गुंतवणूकदार सध्याच्या पातळीवरही या शेअरमध्ये 306 रुपयांच्या शॉर्ट टर्मसाठीसाठी ट्रेड करु शकतात. तर डिफेन्सिव्ह बायर हा स्टॉक 240-250 रुपयांच्या आसपास आढळल्यास 380 चे लाँग टर्म टार्गेट ठेऊ शकतात. तसेच यासाठी 234 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा. Share India चे रवी सिंग यांचे मत आहे की, या शेअरमध्ये लाँग टर्मसाठी सुमारे 250 रुपयाच्या आसपास गुंतवणूक केली पाहिजे. Radhe Developers शेअरमुळे गुंंतवणूकदार मालामाल! सहा महिन्यात स्टॉकमध्ये 3150 टक्क्यांची वाढ डेल्टा कॉर्पच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर, राकेश झुनझुनवाला यांची डेल्टा कॉर्पमधील होल्डिंग जुलै-सप्टेंबर 2021 या तिमाहीत 1.15 कोटी शेअर्स किंवा 4.31 टक्के होती, तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची होल्डिंग 85 लाख शेअर्स किंवा 3.19 टक्के होती. याचा अर्थ या शेअरमध्ये झुनझुनवाला यांची एकून 7.50 टक्के भागिदारी आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या