Home /News /money /

तुमचे पैसे 'या' अ‍ॅपमध्ये गुंतवा; बँक, पोस्टापेक्षा जास्त 12 टक्के व्याज मिळेल अन् कर्जही घेता येईल

तुमचे पैसे 'या' अ‍ॅपमध्ये गुंतवा; बँक, पोस्टापेक्षा जास्त 12 टक्के व्याज मिळेल अन् कर्जही घेता येईल

तुम्ही 12% Club अॅपवर गुंतवणूक (Investment) केल्यास तुम्हाला मिळणारे 12 टक्के व्याज दररोज तुमच्या खात्यात जमा केले जाईल. तुम्ही ते पैसे कधीही काढू शकता. येथे मिळणारे परतावे कोणत्याही मुदत ठेवीपेक्षा जास्त आहेत.

    मुंबई, 9 डिसेंबर : तुम्ही कदाचित '12% Club'ची जाहिरात पाहिली असेल. भारतपेद्वारे (BharatPe) समर्थित गुंतवणूक आणि कर्ज पुरवणारे अॅप आहे. BharatPe ही भारतातील सर्वात मोठी फिनटेक कंपनी (Fintech Company) आहे. जर तुम्ही तुमचे पैसे 12 टक्के दराने गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 12 टक्के व्याज मिळेल. एवढेच नाही तर या अॅपवर तुम्ही कधीही 12 टक्के दराने कर्ज घेऊ शकता. BharatPe ने इनवेस्टमेंट-कम्युलेटिव्ह-बॉरोईंग प्रोडक्ट्ससाठी RBI मंजूर NDFC सह भागीदारी केली आहे. तुम्ही या अॅपवर गुंतवणूक (Investment) केल्यास तुम्हाला मिळणारे 12 टक्के व्याज दररोज तुमच्या खात्यात जमा केले जाईल. तुम्ही ते पैसे कधीही काढू शकता. येथे मिळणारे परतावे कोणत्याही मुदत ठेवीपेक्षा जास्त आहेत. Radhe Developers शेअरमुळे गुंंतवणूकदार मालामाल! सहा महिन्यात स्टॉकमध्ये 3150 टक्क्यांची वाढ 12% Club सह सुरुवात कशी करायची? तुम्हाला तुमचे खाते 12% क्लबमध्ये उघडावे लागेल. तुम्हाला तुमचे KYC पूर्ण करावे लागेल. यानंतर तुम्ही येथे 1000 ते 10 लाख रुपयांपर्यंत ठेवू शकता. तुम्ही दररोज, मासिक किंवा अगदी वार्षिक आधारावर पैसे काढू शकता. >> सर्व प्रथम 12% क्लब अॅप Install करा. >> तुमचा फोन नंबर एंटर करा आणि OTP वापरून कन्फर्म करा. >> एकदा मोबाईल नंबर वॅलिडेट झाल्यानंतर, तुम्हाला अॅपच्या डॅशबोर्डवर नेले जाईल. >> आता तुम्ही 12% क्लब अॅपवर गुंतवणूक सुरू करू शकता. Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 'या' शेअरमध्ये ब्रेकआऊट, गुंतवणूकदारांना खरेदीची संधी गुंतवणूक कशी करावी? >> सर्वप्रथम तुम्हाला "contribute money" पर्यायावर जावे लागेल. >> यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागेल. >> आता "Link Now" वर टॅप करा आणि नंतर ड्रॉप डाउन मेनूमधून तुमचे बँक खाते निवडा. >> यानंतर, तुम्हाला OTP च्या मदतीने तुमचा आधार क्रमांक वॅलिडेट करावा लागेल. >> आधार KYC पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला सेल्फी घेऊन सेल्फी सबमिट करावा लागेल. >>सर्व अटी व शर्ती मान्य केल्यानंतर तुमचे खाते अधिकृत केले जाईल. >>आता तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जोडून 12% पर्यंत व्याज मिळवू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या