जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Radhe Developers शेअरमुळे गुंंतवणूकदार मालामाल! सहा महिन्यात स्टॉकमध्ये 3150 टक्क्यांची वाढ

Radhe Developers शेअरमुळे गुंंतवणूकदार मालामाल! सहा महिन्यात स्टॉकमध्ये 3150 टक्क्यांची वाढ

Radhe Developers शेअरमुळे गुंंतवणूकदार मालामाल! सहा महिन्यात स्टॉकमध्ये 3150 टक्क्यांची वाढ

गेल्या एका आठवड्यात राधे डेव्हलपर्सच्या शेअरची किंमत 309.60 रुपयांवरून 338 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 डिसेंबर : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार (Sahre Market) तेजीत आहे. या तेजीत अनेक स्टॉक्समुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या तेजीत आणि लॉकडाऊन उठवल्यानंतर रिअल इस्टेट शेअर्समध्येही (Real Estate Shares) तेजी पाहायला मिळाली. या रॅलीत राधे डेव्हलपर्सचा (Radhe Developers share) शेअर मल्टीबॅगर ठरला. या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत दमदार कामगिरी केली आहे. राधे डेव्हलपर्स शेअरची प्राईज हिस्ट्री गेल्या एका आठवड्यात राधे डेव्हलपर्सच्या शेअरची किंमत 309.60 रुपयांवरून 338 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात हा (Multibagger Stock) मल्टीबॅगर स्टॉक 190 रुपयांवरून 338 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत त्यात 77 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 10.40 रुपयांवरून 338 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 3150 टक्के वाढ नोंदवली गेली. Credit Card च्या कर्जातून मुक्तता हवी? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा टेन्शन दूर होईल गुंतवणूकदारांना फायदा राधे डेव्हलपर्सचा शेअरची हिस्ट्री दर्शवते की जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका आठवड्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.09 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.77 लाख रुपये झाले असते. Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअरमध्ये ब्रेकआऊट, गुंतवणूकदारांना खरेदीची संधी त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 32.50 लाख झाले असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात