नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: शेअर बाजारात ( stock market ) येणारा कोणत्याही कंपनीचा ( company ) आयपीओ (IPO) गुंतवणूकदारांसाठी ( investors ) कमाईची संधी असते. त्यातही काही कंपन्यांची लोकप्रियता, त्यांचे उत्पादन, सुविधा अशा असतात की त्याकडे गुंतवणूकदार खास आकर्षित होतात. या आयपीओ मध्ये गुंतवणूकदारांना कमाई करण्याची संधी मिळत असते. पुढील आठवड्यात पेटीएम (Paytm) आणि सफायर फूड्स इंडिया (Sapphire Foods India) या दोन कंपनीचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. झी बिझनेस ने याबाबत वृत्त दिलं आहे.
शेअर बाजारात या आठवड्यात 3 आयपीओ लाँच करण्यात आले, तर पुढील आठवड्यात 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी प्रायमरी मार्केटमध्ये 2 मोठे आयपीओ लाँच होणार आहेत. यामध्ये पेटीएम आणि सफायर फूड्स इंडिया या कंपन्यांच्या आयपीओचा समावेश आहे. या दोन्हींची मिळून आयपीओ साईज 20373 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. पेटीएमचा आयपीओ 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान खुला असेल. दुसरीकडे, सफायर फूड्स इंडियाचा आयपीओ 9 नोव्हेंबरला खुला होणार असून 11 नोव्हेंबर 2011ला बंद होईल. जर तुम्ही यामध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
सर्वात मोठा आयपीओ
पेटीएमचा आयपीओ 18300 कोटी रुपयांचा असणार आहे. पेटीएमचा आयपीओ हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. याआधी कोल इंडिया या सरकारी कंपनीने 15000 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला होता. सुरुवातीला पेटीएमच्या आयपीओची साईज 16,600 कोटी होती, ती 18,300 कोटी करण्यात आली आहे.
हेही वाचा- Gold Prices Today: सोन्याच्या किंमतीत 600 रुपयांची वाढ, चांदीतही जबरदस्त उसळी
पेटीएमच्या आयपीओ मध्ये 8300 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, 10 हजार कोटींचे ऑफर फॉर सेल (OFS) असतील. ओएफएसचा जवळपास निम्मा हिस्सा हा अँट फायनान्शिअल आणि उर्वरित अलिबाबा, एलिवेशन कॅपिटल, सॉफ्टबँक आणि इतर विद्यमान शेअरधारकांच्या मालकीचा आहे.
हेही वाचा- Business Idea: नोकरी करता करता अत्यंत कमी खर्चात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल बंपर कमाई
सफायर फूड्स इंडियाचा 9 नोव्हेंबरला आयपीओ होणार लाँच
केएफसी (KFC) आणि पिझ्झा हट ( Pizza Hut ) चालवणाऱ्या सफायर फूड्स कंपनीचा आयपीओ 9 नोव्हेंबर 2021 ला ओपन होईल, तर तो 11 नोव्हेंबरला बंद होईल. या आपीओचा आकार 2073 कोटी रुपये असेल. यामध्ये फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जाणार नाहीत. फक्त ऑफर फॉर सेल (OFS) असेल. 22 नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्स्चेंजवर स्टॉकची नोंद होईल.
कंपनीने त्याच्या आयपीओची किंमत 1120-1180 रुपये निश्चित केली आहे. 12 शेअर्सची एक लॉट साईज निश्चित करण्यात आली आहे. यासाठी प्राइज बँड नुसार 14160 रूपये गुंतवावे लागतील.
या कंपनीच्या आयपीओमध्ये 75 कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर असेल. ज्या अंतर्गत कंपनीचे विद्यमान प्रमोटर्स आणि शेअर होल्डर्स त्यांचे स्टेक विकतील. या ऑफर फॉर सेलमध्ये QSR मॅनेजमेंट ट्रस्ट 8.50 लाख शेअर्स विकणार आहे. तर Sapphire Foods Mauritius Ltd हे 55.75 लाख शेअर्स विकणार आहे. तर WWD Ruby Ltd 48.46 लाख शेअर्स विकणार आहे. Amethyst Pvt. Ltd 39.62 लाख शेअर्स विकणार आहे. तसेच ऑफर फॉर सेलमध्ये, AAJV Investment Trust 80,169 शेअर्स विकेल. तर Edelweiss Crossover Opportunities Fund 16.15 लाख शेअर्स विकणार आहे. त्याच वेळी, Edelweiss Crossover Opportunities Fund Series II 6.46 लाख शेअर्स विकणार आहे.
भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये केएफसी, पिझ्झा हट आणि Taco Bell या नावाने 437 रेस्टॉरंट सफायर फूड्स कंपनी चालवते. JM Financial, BofA Securities, ICICI Securities आणि IIFL Securities यांना इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.
हेही वाचा- राकेश झुनझुनवालांसह दिग्गज गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी; 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment