मराठी बातम्या /बातम्या /मनी /Business Idea: नोकरी करता करता अत्यंत कमी खर्चात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल बंपर कमाई

Business Idea: नोकरी करता करता अत्यंत कमी खर्चात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल बंपर कमाई

नोकरी करता-करता अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी अनेक बिझनेस आयडियाचा (Small Business Idea) अवलंब अनेकजण करतात. जर तुम्ही नोकरी करताना अशाप्रकारे अतिरिक्त पैसे कमवायचा विचार करत असाल तर अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत

नोकरी करता-करता अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी अनेक बिझनेस आयडियाचा (Small Business Idea) अवलंब अनेकजण करतात. जर तुम्ही नोकरी करताना अशाप्रकारे अतिरिक्त पैसे कमवायचा विचार करत असाल तर अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत

नोकरी करता-करता अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी अनेक बिझनेस आयडियाचा (Small Business Idea) अवलंब अनेकजण करतात. जर तुम्ही नोकरी करताना अशाप्रकारे अतिरिक्त पैसे कमवायचा विचार करत असाल तर अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: नोकरी करता-करता अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी अनेक बिझनेस आयडियाचा (Small Business Idea) अवलंब अनेकजण करतात. जर तुम्ही नोकरी करताना अशाप्रकारे अतिरिक्त पैसे कमवायचा विचार करत असाल तर अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. हे असे व्यवसाय आहेत जे अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात. जेव्हा तुमची कमाई वाढेल, तेव्हा त्या हिशोबाने ही गुंतवणूकही वाढवू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला एका अशा व्‍यवसायाबद्दल सांगणार आहोत, जो केवळ 50,000 रुपयांमध्‍ये सुरू करता येतो. वाचा काय आहेत या बिझनेस आयडिया...

अगरबत्तीचा व्यवसाय आहे चांगला पर्याय

छोट्या गुंतवणुकीतून उभारता येणारा हा अगरबत्तीचा व्यवसाय आहे. तुम्ही तुमच्या घरी अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. अगरबत्ती बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे वापरली जातात. यामध्ये मिक्सर मशीन, ड्रायर मशीन आणि मुख्य उत्पादन मशीन यांचा समावेश आहे. भारतामध्ये अगरबत्ती बनवण्याच्या मशीनची किंमत 35000 ते 175000 रुपयांपर्यंत आहे. या मशीनमधून एका मिनिटात 150 ते 200 अगरबत्ती बनवता येतात. जर तुम्ही हाताने अगरबत्ती बनवली तर तुम्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीपासून सुरुवात करू शकता.

हे वाचा-LPG cylinder Subsidy बाबत मोदी सरकारची नवी योजना, कुणाच्या खात्यात येणार पैसे?

काय लागेल कच्चा माल?

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात गम पावडर, चारकोल पावडर, बांबू, नर्गिस पावडर, सुगंधी तेल, पाणी, सेंट, फुलांच्या पाकळ्या, चंदनाचे लाकूड, जिलेटिन पेपर, शॉ डस्ट, पॅकिंग इत्यादीचा समावेश आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी तुम्ही बाजारातील पुरवठादारांशी संपर्क साधू शकता.

लोणचं बनवण्याचा व्यवसाय

तुम्ही घरबसल्या लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 10,000 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्ही महिन्याला किमान 30,000-3,5000 रुपये आणि यामध्ये जम बसल्यास वर्षाला लाखो रुपये कमावू शकता. तुम्ही लोणचे ऑनलाइन, घाऊक बाजार, किरकोळ बाजार किंवा रिटेल चेन द्वारे विकू शकता.

हे वाचा-लवकरच तुमची कार धावेल 60 रुपये प्रतिलिटर दरात, मोदी सरकारचा नवा प्लॅन

सरकार मदत करत आहे

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 900 चौरस फूट क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे. लोणची तयार करणे, लोणचे सुकवणे, लोणचे पॅकिंगसाठी मोकळी जागा लागते. लोणचे जास्त काळ खराब होणार नाही याची खात्री करण्यासाठी ते अत्यंत स्वच्छतेने बनवले जाते.

First published:
top videos

    Tags: Business, Business News, Small business