मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Prices Today: सोन्याच्या किंमतीत 600 रुपयांची वाढ, चांदीतही जबरदस्त उसळी

Gold Prices Today: सोन्याच्या किंमतीत 600 रुपयांची वाढ, चांदीतही जबरदस्त उसळी

सणासुदीच्या काळात सोन्याच्या खरेदीचा विचार (Gold Rate Today) करत असाल तर आज सोन्याचा काय भाव आहे हे जाणून घ्या. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे मुहूर्त ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याच्या (Gold Rate on MCX) किमतीत जोरदार उसळी पाहायला मिळाली आहे

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 05  नोव्हेंबर: सणासुदीच्या काळात सोन्याच्या खरेदीचा विचार (Gold Rate Today) करत असाल तर आज सोन्याचा काय भाव आहे हे जाणून घ्या. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे मुहूर्त ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याच्या (Gold Rate on MCX) किमतीत जोरदार उसळी पाहायला मिळाली आहे. एमसीएक्स गोल्ड फ्युचर्स 1.5 टक्क्यांनी वाढून 47,571 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याच्या किंमतीत साधारण 600 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव 2.8 टक्क्यांनी वाढून 64,224 रुपये प्रति किलो झाला आहे.

काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती?

आंतरराष्ट्रीय बाजारात US Gold Future बुधवारच्या 3 आठवड्यांच्या नीचांकी स्तरावरून 1.8 टक्क्यांनी वधारला आहे आणि $1795.70 वर झेप घेतली आहे. दुसरीकडे, चांदी 1.2 टक्क्यांनी वाढून 23.79 डॉलर प्रति औंस झाली आहे. दरम्यान, यूएस फेडने गुरुवारी अशी माहिती दिली आहे की, ते या महिन्यापासून रोखे खरेदी कार्यक्रमात कपात करण्यास सुरुवात करतील. यासोबतच व्याजदर वाढवण्यात कोणतीही हलगर्जीपणा दाखवला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचा-आज पेट्रोलचे दर सामान्यांना परवडणारे आहेत का? जाणून घ्या इंधनाचा लेटेस्ट भाव

दरम्यान, बँक ऑफ इंग्लंडनेही व्याजदरातील कोणत्याही बदलाची योजना होल्डवर ठेवली आहे. सणासुदीच्या काळात बाजारात खरेदी सुरू असल्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे कमोडिटी बाजारातील दिग्गजांचे म्हणणे आहे.

हे वाचा-LPG cylinder Subsidy बाबत मोदी सरकारची नवी योजना, कुणाच्या खात्यात येणार पैसे?

मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे अध्यक्ष अहमद एमपी म्हणतात की दिवाळीपर्यंत सोन्याच्या विक्रीत 30-40 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच देशात लग्नसराईचा हंगामही सुरू होणार आहे, हे लक्षात घेऊन सोने, चांदी आणि इतर हिरे आणि दागिन्यांच्या विक्रीत चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today