मराठी बातम्या /बातम्या /मनी /राकेश झुनझुनवालांसह दिग्गज गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी; 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक

राकेश झुनझुनवालांसह दिग्गज गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी; 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक

राकेश झुनझुनवाला यांचे नाव कॅनरा बँक, नाल्को आणि इंडियाबुल्स रिअल इस्टेटच्या सार्वजनिक भागधारकांमध्ये दिसून आले आहे, जेथे सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस त्यांचे 1.1-1.6 टक्के हिस्सेदारी होती

राकेश झुनझुनवाला यांचे नाव कॅनरा बँक, नाल्को आणि इंडियाबुल्स रिअल इस्टेटच्या सार्वजनिक भागधारकांमध्ये दिसून आले आहे, जेथे सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस त्यांचे 1.1-1.6 टक्के हिस्सेदारी होती

राकेश झुनझुनवाला यांचे नाव कॅनरा बँक, नाल्को आणि इंडियाबुल्स रिअल इस्टेटच्या सार्वजनिक भागधारकांमध्ये दिसून आले आहे, जेथे सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस त्यांचे 1.1-1.6 टक्के हिस्सेदारी होती

मुंबई, 5 नोव्हेंबर : मोठ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर किरकोळ गुंतवणूकदार लक्ष ठेऊन असतात. मोठ्या गुंतवणूकदारांना फॉलो करुन चांगले रिटर्न मिळवणे हा त्यामागील हेतू असतो. शेअर बाजारातील (Share Market Investers) मोठ्या गुंतवणूकदारांनी सप्टेंबरच्या तिमाहीत जोरदार खरेदी केली. या दिग्गज गुंतवणूकदारांमध्ये राकेश झुनझुनवाला, डोली खन्ना, आशिष कचोलिया आणि मुकुल अग्रवाल यांचा समावेश आहे. या सर्व मोठ्या गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेत याची माहिती घेऊया.

एबीपी न्युजच्या वृतानुसार, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhujhunwala) यांनी त्यांच्या आवडत्या टायटन कंपनीमध्ये (Titan Share Price) त्यांचा 0.1 टक्के हिस्सा वाढवला आहे. बँक, मेटल आणि रिअल इस्टेट कंपन्या त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडल्या आहेत.

राकेश झुनझुनवाला यांचे नाव कॅनरा बँक, नाल्को आणि इंडियाबुल्स रिअल इस्टेटच्या सार्वजनिक भागधारकांमध्ये दिसून आले आहे, जेथे सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस त्यांचे 1.1-1.6 टक्के हिस्सेदारी होती. 1 टक्के किंवा त्याहून अधिक होल्डिंग असल्यास एखाद्या गुंतवणूकदाराचे नाव सार्वजनिक भागधारकांच्या यादीमध्ये दिसते. मात्र सप्टेंबरच्या तिमाहीतच संपूर्ण स्टेक विकत घेतला होता किंवा त्यापूर्वी 1 टक्के पेक्षा कमी स्टेक होता, जो वाढवला होता हे निश्चित करता आले नाही. झुनझुनवाला यांनी मानधना रिटेलमधील (Mandhana Retail) स्टेक 5.35 टक्क्यांनी कमी करून 7.4 टक्के केला आहे.

दिवाळीदिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, मुंबईत तरीही भाव शंभरीपारच!

चेन्नईचे दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांचे नाव NDTV च्या पब्लिक शेअरहोल्डर्समध्ये 1.1 टक्के स्टेकसह दिसले. दुसरीकडे मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्स खरेदी करणारे सुप्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरर फेज थ्री (FAze Three) चा समावेश केला आहे. त्यांच्या नवीन होल्डिंगमध्ये फेज थ्री तसेच एक्सप्रो इंडियाचा (Expro India) समावेश आहे. फेज थ्री त्यांची हिस्सेदारी 2.8 टक्के आणि एक्सप्रो इंडियामध्ये 2.5 टक्के आहे.

Cryptocurrency: या 6 नाण्यांमुळे गुंतवणूकदार मालामाल, दिवसाला 2,340.75% चा फायदा

गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल (Mukul Agarwal) यांनी या काळात सर्वाधिक खरेदी केली. पारस डिफेन्स, एमटीएआर टेक्नॉलॉजीज, विधी स्पेशालिटी फूड, थॉमस कूक, ऑलकार्गो लॉजिस्टिक, जेट फ्रेट लॉजिस्टिक्स, रॅडिको खेतान, जोटा हेल्थकेअर, गोल्डियम इंटरनॅशनल या सार्वजनिक भागधारकांच्या यादीत त्यांचे नाव आले. या कंपन्यांमध्ये त्यांचा 1.1 ते 6.5 टक्के हिस्सा आहे.

First published:
top videos

    Tags: Money, Share market