नवी दिल्ली, 31 मार्च : तुम्ही पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी (AADHAAR Card) लिंक केलं का? इनकम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 दिली आहे. परंतु आज शेवटच्या दिवशी अनेक लोकांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर पॅन कार्ड, आधारशी लिंक करण्यास समस्या येत आहेत. अशात तुम्ही एसएमएस पाठवून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकतात. SMS पाठवून पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची पद्धत - UIDPAN टाईप करून 12 अंकी Aadhaar नंबर लिहा आणि त्यानंतर 10 अंकी पॅन नंबर लिहा. आता हा एसएमएस 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. UIDPAN<आधार क्रमांक><पॅन क्रमांक> उदा. UIDPAN 111122223333 AAAPA9999Q इनकम टॅक्स वेबसाईटद्वारे पॅन-आधार लिंक करण्याची पद्धत - - सर्वात आधी इनकम टॅक्स https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वेबसाईटवर जा. - तिथे तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून, तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल.
(वाचा - केवळ 94 पैसे दररोज खर्च करुन मिळवा 4 लाखांचा इन्शोरन्स, घरबसल्या असा घ्या फायदा )
- त्यानंतर Link Aadhaar वर क्लिक करुन, आधार कार्डवरील नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर एंटर करा. - आवश्यक माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड एंटर करा. - आता Link Aadhaar वर क्लिक करा. त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल. - ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल. NSDL किंवा UTIITSL सर्विस सेंटर - पॅन सर्विस प्रोव्हाईडर, NSDL किंवा UTIITSL च्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं जाऊ शकतं. त्यासाठी फॉर्म Annexure-I भरावा लागेल. यासाठी पॅन-आधार कार्डच्या कॉपीची गरज लागेल. या प्रोसेससाठी फी द्यावी लागेल.