नवी दिल्ली, 29 मार्च : कॅनरा बँक (Canara Bank) आपल्या सर्व खातेधारकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत (PMSBY) दररोज केवळ 94 पैशांत 4 लाख रुपयांचा इन्शोरन्स देते आहे. या दोन्ही योजनांसाठी अप्लाय करणं सोपं आहे. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून PMJJBY आणि PMSBY साठी अर्ज करता येईल. कॅनरा बँकेने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
काय आहे PMJJBY योजना?
PMJJBY एक टर्म इन्शोरन्स प्लॅन आहे आणि हा इन्शोरन्स घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळतात. मोदी सरकारने 9 मे 2015 मध्ये या योजनेची सुरुवात केली होती.
या स्किमचा वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेसाठी कोणत्याही मेडिकल चाचणीची आवश्यकता नसते. 18 ते 50 वर्ष वयोगटातील लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) कोणत्याही तारखेली घेतली असली, तरी पहिल्या वर्षासाठी त्याचं कव्हरेज दुसऱ्या वर्षी 31 मेपर्यंत होतं.
काय आहे PMSBY?
PMSBY अर्थात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हा एक अॅक्सिडेंटल इन्शोरन्स आहे. यात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, किंवा पूर्णपणे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळतात. या योजनेसाठी 12 रुपये वार्षिक प्रीमियम आहे. ही योजना दरवर्षी ऑटो रिन्यू होते किंवा रिन्यू करावी लागते.
दरवर्षी ही योजना रिन्यू होते. या योजनेत तीन प्रकारचे फायदे मिळतात. जर अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. जर विमाधारकाचा अपघातात हात, पाय, डोळे गेल्यास त्यालाही 2 लाख रुपये मिळतात. जर एक हात किंवा एक पाय किंवा एक डोळा गेल्यास त्याला 1 लाख रुपये मिळतात.
या योजनेसाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 आणि अधिकाधिक 70 वर्ष आहे.
No more lengthy forms! Now apply for PMJJBY and PMSBY through Internet Banking or Mobile Banking!#PMJJBY #PMSBY #SocialSecurity pic.twitter.com/PwsMZH8PGa
— Canara Bank (@canarabank) March 28, 2021
94 पैसे खर्च करुन मिळवा 4 लाख रुपयांचा फायदा -
PMSBY चा वार्षिक प्रीमियम 12 रुपये आहे आणि PMJJBY चा वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. एकूण मिळून दोन्ही इन्शोरन्सचा प्रीमियम 342 रुपये वार्षिक आहे. म्हणजेच एक दिवसाचा प्रीमियम जवळपास 94 पैसे इतका पडतो. 94 पैसे खर्च करून 4 लाख रुपयांचा फायदा घेता येऊ शकतो.
कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेशी जोडण्यासाठी आता कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. घरबसल्या नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगने या योजनेशी जोडता येऊ शकतं. अधिक माहितीसाठी www.canababank.com या वेबसाईटवर किंवा 1800 425 0018, 1800 208 3333, 1800 103 0018, 1800 3011 3333
या क्रमांकावर कॉल करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance